डबल डेकर बसचं होणार ग्रॅंड कमबॅक; बेस्टच्या ताफ्यात येणार ९०० नव्या बस

नव्या आकर्षक आणि आरामदायी बसेसनं मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार
Mumbai Best Duble Decker Bus
Mumbai Best Duble Decker Bus

मुंबईची विशेष ओळख बनलेल्या लाल रंगाच्या डबल डेकर बसचं (Double Decker Bus) आता पुन्हा नव्या रुपात कमबॅक होणार आहे. नव्या आकर्षक डिझाईनसह ही वातानुकुलित आणि प्रदुषणविरहित इलेक्ट्रिक बस (Electric Bus) मुंबईच्या रस्त्यांवर धावणार आहे. यासाठी बेस्टनं ९०० एसी बसची खरेदी प्रक्रिया सुरु केली आहे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली. (BEST is procuring 900 AC electric double decker buses for Mumbai)

आदित्य ठाकरे म्हणाले, "बेस्टच्या बसच्या ताफ्यात आम्ही वाढ केली आहे. यामध्ये १० हजार इलेक्ट्रिक बसेसचा समावेश आहे. यामध्ये आरामदायी प्रवासासाठी जास्तीत जास्त डबल डेकर बसेस असाव्यात हे आमचं ध्येय आहे"

Mumbai Best Duble Decker Bus
एअर इंडियाची पुन्हा टाटांकडे घरवापसी; शंभर टक्के समभागांचं हस्तांतरण पूर्ण

काय आहेत या नव्या बसची वैशिष्ट्ये?

मूळ लाल रंग कायम, आकर्षक डिझाईन, पूर्णपणे इलेक्ट्रिक बस, बंद-चालू होणारे स्वयंचलित दरवाजे, आवाज-हवा प्रदुषणविरहित, आरामदायी सीट्स तसेच संपूर्ण वातानुकुलीत व्यवस्था अशी या नव्या डबल डेकर बसची वैशिष्ट्ये आहेत. मुंबई महापालिकेची परिवहन व्यवस्था असलेल्या बेस्ट कंपनीनं या ९०० एसी बसच्या खरेदीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com