बेस्टतर्फे 12 मार्गांवर वातानुकूलित बससेवा सुरू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

बेस्टच्या ताफ्यात 55 वातानुकूलित बस गाड्या दाखल झाल्या असून त्या बसगाड्या बेस्टने विविध मार्गांवर सुरू केल्या आहेत. 

मुंबई - बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात नव्याने वातानुकूलित बसगाड्या दाखल झाल्याने मुंबईकरांचा प्रवास आता अधिक गारेगार होणार आहे. बेस्टच्या ताफ्यात 55 वातानुकूलित बस गाड्या दाखल झाल्या असून त्या बसगाड्या बेस्टने विविध मार्गांवर सुरू केल्या आहेत. 

हेही वाचा : सिडकोचे अधिकारी नागरिकांच्या भेटीला!

बेस्ट उपक्रमाने बेस्ट भाडे कपात केल्याने बस प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी बेस्टच्या बस ताफ्यातील स्वतःच्या मालकीच्या बसगाड्यांची संख्या कमी होत आहे. सध्या बस ताफा कमालीचा घटला आहे. बेस्टकडे नवीन बस घेण्यासाठी निधी नसल्यामुळे व वाढता खर्च कमी करण्यासाठी खाजगी बस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला होता. त्यानुसार दोन कंत्राटदारांच्या 55 मिनी व मिडी वातानुकूलित बस ताफ्यात दाखल झाल्या असून बेस्ट उपक्रमाने विविध मार्गांवर त्या नुकत्याच सुरू केल्या आहेत. सध्या मिनी वातानुकूलित बस 12 मार्गांवरून सुरू करण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा : पायाभूत प्रकल्पांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - उद्धव ठाकरे ​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Best launches air-conditioned bus service on 12 routes

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: