बेस्टचे किमान तिकीट 5 रुपये 

बेस्टचे किमान तिकीट 5 रुपये 

मुंबई - बेस्टचे पहिल्या पाच किलोमीटरसाठी 5 रुपये दर मंगळवार(ता.9)पासून लागू झाले आहेत.तर,आता पर्यंत पहिल्या दोन किलोमीटरच्या टप्प्यासाठी 8 रुपये किमान तिकीट होते.नव्या तिकीट दरानुसार बेस्टचे जास्तीत जास्त तिकीट 20 रुपये असेल.मात्र,यात हाफ तिकीट मिळणार नाही. 

बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी महानगर पालिकेने 600 कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.त्या बदल्यात प्रवाशी संख्या वाढावी म्हणून बेस्टने तिकीट दर कमी करावे असा प्रस्ताव महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी ठेवला होता.त्यानुसार बेस्ट समिती पाठोपाठ महापालिका महासभा यांनी तिकीट दर कपात करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.त्यानंतर राज्याच्या परिवहन प्राधिकरणाने आज या प्रस्तावाला मंजूरी दिली असून उद्या पासून नवे दर लागू होणार असल्याचे महानगर पालिके मार्फत सांगितले.बेस्टच्या ताफ्यता येत्या काळात एसी बसेस,बॅटरीवर चालणाऱ्या बसेसही दाखल होणार आहे.

पुढील काही महिन्यात बेस्टच्या ताफा सुमारे तीन हजारावरुन सहा हजारा पर्यंत पोहचणार आहे.यासाठी भाड्याने बसेस घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

बेस्टच्या तिकीटासाठी फेररचना करण्यात आली असून पुर्वी दोन किलोमीटरसाठी आठ रुपये असलेले दर पाच किलोमीटरसाठी पाच रुपये दर करण्यात आले आहे.तर,एसी बसचे किमान तिकीट सहा रुपये असेल.तर,पुर्वी बेस्टच्या सर्वात शेवटच्या टप्प्यासाठी म्हणजे 45 किलोमीटर पुढील प्रवासाठी 46 रुपये मोजावे लागत होते.मात्र,आता जास्तीत जास्त 25 रुपये तिकीट असेल. 

बेस्टचे सुधारीत तिकीट दर(रुपयात) 
किलोमीटर - साधी बस --- एसी बस 
05---05 -----06 
5 ते 10 -----10---13 
10 ते 15---15---19 
15 किमी वर -------20-------25

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com