बेस्ट कार्यालयात चोरीचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

मुंबई - कुलाब्यातील बेस्ट भवनमधील कार्यालयात अनोळखी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनोळखी चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. कुलाबाच्या साबुसिद्धीकी रोडवरील न्यू म्युनसिपल बिल्डिंगमध्ये बेस्टचे कार्यालय आहे. कार्यालयात काम करणारे भरत बोऱ्हाडे सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे कार्यालयाला कुलूप लावून गेले. दरम्यान मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कार्यालयात आले असता. त्यांना कार्यालयाचे कुलूप तुटलेले दिसले.

मुंबई - कुलाब्यातील बेस्ट भवनमधील कार्यालयात अनोळखी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनोळखी चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. कुलाबाच्या साबुसिद्धीकी रोडवरील न्यू म्युनसिपल बिल्डिंगमध्ये बेस्टचे कार्यालय आहे. कार्यालयात काम करणारे भरत बोऱ्हाडे सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे कार्यालयाला कुलूप लावून गेले. दरम्यान मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कार्यालयात आले असता. त्यांना कार्यालयाचे कुलूप तुटलेले दिसले. अनोळखी व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Best office theft attempt