बेस्ट भाडेवाढ अटळ!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

मुंबई - आर्थिक संकटात अडकलेल्या ‘बेस्ट’ला आधार देण्यासाठी वर्षाकाठी ७५० कोटी रुपयांची बचत करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. त्यासाठी कामगार कपात तसेच आऊटसोर्सिंगसारख्या उपाययोजना करण्याबरोबरच भाडेवाढ करून प्रशासन प्रवाशांच्या खिशात हात घालण्यात येणार आहे. त्या माध्यमातून वर्षाला ११९ ते २०८ कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचा ‘बेस्ट’चा विचार आहे.  

मुंबई - आर्थिक संकटात अडकलेल्या ‘बेस्ट’ला आधार देण्यासाठी वर्षाकाठी ७५० कोटी रुपयांची बचत करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. त्यासाठी कामगार कपात तसेच आऊटसोर्सिंगसारख्या उपाययोजना करण्याबरोबरच भाडेवाढ करून प्रशासन प्रवाशांच्या खिशात हात घालण्यात येणार आहे. त्या माध्यमातून वर्षाला ११९ ते २०८ कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचा ‘बेस्ट’चा विचार आहे.  

‘बेस्ट’चा यंदाचा अर्थसंकल्प ५९० कोटींचा तुटीचा आहे. या पार्श्‍वभूमीवर बेस्टला दीड हजार कोटी रुपये देण्याची मागणी प्रशासनाने मुंबई पालिकेकडे केली आहे. हा निधी देण्यापूर्वी ‘बेस्ट’ला तोट्यातून बाहेर काढण्याचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. त्यानुसार बेस्ट प्रशासनाने वार्षिक ७५० कोटी रुपयांच्या बचतीचा आराखडा तयार केला आहे. त्यात भाडेवाढीच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. 

करवाढ करून बेस्टला मदत 
बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी दीड कोटींचा निधी देण्याची तयारी पालिकेने दर्शवली आहे. करवाढ करून ही मदत देण्याचे संकेत पालिका आयुक्तांनी दिले आहेत. 
‘बेस्ट’ला निधी देण्यासाठी कुठे तरी करवाढ करावी लागेल, अशी भूमिका आयुक्तांनी नुकतीच पालिकेतील सर्व पक्षांच्या गटनेत्यांसमोर मांडली. पालिका ‘बेस्ट’ला रोजचा खर्च भागवण्यासाठी निधी देणार नाही. पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टिमसारख्या प्रकल्पांसाठी ही मदत असेल. ती महागड्या बसच्या खरेदीसाठी नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

बचतीची सहा सूत्रे
बचत करता यावी, यासाठी सहा सूत्रांचा वापर करावा, अशी शिफारस पालिकेने केली आहे. या सूत्रांच्या मदतीने ५० कोटींची बचत होऊ शकेल, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांचे म्हणणे आहे.

 अत्यावश्‍यक कर्मचारी आणि ज्याची कामे इतर कर्मचारी करू शकतील, अशा कर्मचाऱ्यांची विभागणी करून कर्मचाऱ्यांची संख्या नियंत्रित करावी.
 बसवाहक (कंडक्‍टर) आणि चालक अशा दोन्ही कामांची तयारी असलेल्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून एकच कर्मचारी आवश्‍यकतेनुसार काम करू शकेल.
 अभियांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांना विविध कामांचे प्रशिक्षण द्यावे.
 बस निरीक्षक आणि बस प्रवर्तक ही दोन्ही पदे एकत्र करावीत.
 रिक्त पदे न भरता आवश्‍यक तेवढीच पदे भरावीत. उर्वरित कामे उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून करून घ्यावीत.
 प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन आवश्‍यकतेनुसार बसची संख्या मर्यादित ठेवावी.

Web Title: Best rent is inevitable