बेस्टचे तीन दिवसांत 800 कर्मचारी निवृत्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

मुंबई - बेस्ट उपक्रमातील 800 कर्मचारी आणि अधिकारी तीन दिवसांत सेवानिवृत्त झाले. हजारो रिक्त पदे भरण्यात प्रशासन उदासीन असल्याने बेस्टच्या सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. त्याचा परिणाम बेस्टच्या उत्पन्नावर होत असल्याची तक्रार गुरुवारी बेस्टच्या सर्वपक्षीय सदस्यांनी केली. 

बेस्ट उपक्रमात वर्षभरात तब्बल 3500 बसचालक, वाहक, अधिकारी सेवानिवृत्त झाले. तीन दिवसांत 800 कर्मचारी-अधिकारी निवृत्त झाले; मात्र बेस्ट उपक्रम रिक्त पदे भरत नसल्याने सध्याच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, बेस्टच्या उत्पन्नावरही परिणाम होत असल्याचा आरोप बेस्ट समितीचे सदस्य सुहास सामंत यांनी केला. 

रिक्त पदे न भरल्याने एका पर्यवेक्षकाला तीन-तीन आगारांचे काम सांभाळण्याची कसरत करावी लागते. तिकीट व रोख विभागात पैशांची मोजणी शिपायांना करावी लागते, अशी तक्रार भाजपचे सुनील गणाचार्य यांनी समिती अध्यक्षांकडे केली. सदस्य अनिल कोकिळ, श्रीकांत कवठणकर यांनीही रिक्त पदे भरण्याची मागणी केली. 

Web Title: Best retired 800 employees in three days