बेस्ट सेवा होणार ठप्प

बेस्ट सेवा होणार ठप्प

मुंबई - बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या मागण्यांबाबत प्रशासनासोबतची चर्चा निष्फळ ठरल्याने सोमवार आणि मंगळवारमधील मध्यरात्रीपासून संप सुरू होणार आहे. शिवसेनेने या संपाला पाठिंबा दिल्यामुळे बेस्टची बससेवा मंगळवारी (ता. 8) ठप्प होण्याची दाट शक्‍यता आहे. दरम्यान, वाटाघाटीसाठी बेस्ट प्रशासनाने कृती समितीच्या शिष्टमंडळाला सोमवारी (ता. 7) दुपारी 3 वाजता बोलावले आहे. 

बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कामगार संघटनांनी महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्याशी चर्चा केली; परंतु प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे चर्चा फिस्कटली. कर्मचाऱ्यांच्या बोनसपासून अनेक मागण्यांवर अद्याप तोडगा निघाला नसल्यामुळे संप पुकारला जाणार आहे. बेस्ट कामगारांच्या प्रश्‍नांवरून मागील शुक्रवारी बेस्ट समितीची बैठक गाजली होती. कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत महाव्यवस्थापक गंभीर नसल्याने सर्व पक्षांनी प्रशासनाचा निषेध नोंदवल्याने बैठक तहकूब करण्यात आली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com