बेस्टचा संप सातव्या दिवशीही सुरूच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

मुंबई : बेस्ट ठप्प असल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल सुरु आहेत. संपाबाबत आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने नेमलेल्या  त्रिसदस्यीय समितीची बैठक आता लवकरच सुरू होणार आहे.  या पूर्वी त्रिसदस्यीय समितीपुढे कामगार  संघटनांच्या कृती समितीने आपली बाजू मांडली आहे. आजही समितीपुढे आपली बाजू मांडणार आहेत. त्रिसदस्यीय समिती आपला अहवाल आज न्यायालयात सादर सादर करणार आहे. आता  सर्वांचे डोळे न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहेत. 

कामगारांच्या मागण्यांबाबत समाधानकारक चर्चा न करता, संप बेकायदेशीर ठरवून मेस्मा कायद्याअंतर्गत निवासस्थानेही रिकामी करण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर बेस्टचा संप चिघळला. त्यानंतर महाव्यवस्थापक, पालिका आयुक्त महापौर बंगला, राज्याचे मुख्य सचिव आणि उच्च न्यायालयाने नियुक्ती केलेली उच्चस्तरीय समिती यांच्यासोबत कामगारांच्या कृती समितीच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र त्यातून कोणताही निर्णय झाला नाही.

शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. त्यामुळे आज सातव्या दिवशी संप सुरूच आहे. या संपाचा फटका मुंबईकरांना बसला आहे. बेस्टचा संपाबाबत काल रविवारी कोणत्याही वाटाघाटी झाल्या नाहीत. आम्ही आमची बाजू त्रिसदस्य समितीपुढे मांडली आहे. आता न्यायालयासमोर मांडली जाईल, अशी माहिती कृती समितीचे नेते शशांक राव यांनी दिली.

Web Title: BEST strike continues on 7th day