तुम्ही 2,40,000 लोकांचा घात केलाय- मनसे

तुम्ही 2,40,000 लोकांचा घात केलाय- मनसे

मुंबई- मराठी मराठी म्हणून आजपर्यंत राजकारण केले. आज त्यांच्याच पोटावर, त्यांच्याच आई बहिणीवर कारवाई करताय लक्षात ठेवा तुम्ही फक्त 40 हजार कामगार तोडले नाहीत तर प्रत्येक कुटुंबात 5/6माणसं आहेत् विचार करा 40000*6=240000 लोकांचा तुम्ही विश्वास घात केल्याचा आरोप मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी शिवसेनेवर केला.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी वेतनसंदर्भात पुकारलेल्या संपात शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे. बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत, पण मुंबईकरांचे हाल करण्याची इच्छा कोणत्याही कर्मचाऱ्याची नाही. इतका अन्याय होऊनही कर्मचाऱ्यांनी कधी संप पुकारला नाही. आता मुंबईकरांनीही या कर्मचाऱ्यांना साथ द्यायला हवी, असे आवाहन करतानाच आता कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही तर सोमवारी मुंबईतील रस्त्यावर तमाशा होईल आणि यासाठी प्रशासन व सत्ताधारीच जबाबदार असतील, असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.

संदीप देशपांडे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत शिवसेनेवर निशाणा साधला. ‘आजवर मराठी मराठी म्हणून राजकारण केले, पण आता त्यांच्याच पोटावर, त्यांच्याच आई बहिणीवर कारवाई करताय. लक्षात ठेवा तुम्ही फक्त 40 हजार कामगार तोडले नाहीत तर प्रत्येक कुटुंबात 5 ते 6 माणसं आहेत. आता विचार करा तुम्ही किती लोकांचा विश्वासघात केला, असे देशपांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी या पोस्टमधून शिवसेनेने केलेल्या घोटाळ्यांचा पाढाच वाचला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com