बेस्टचे होणार डिजिटायजेशन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

मुंबई - बेस्टच्या देयकांचा भरणा, नवीन विजेच्या मीटरची मागणी, विद्युतबिलांची माहिती आणि तक्रार नोंदणी पद्धती आता बेस्टने मोबाईल ऍपद्वारे विकसित केली आहे. दस्तऐवजांचे स्कॅनिंग, नवीन प्रकल्प, त्यांची अंमलबजावणी आणि सध्याच्या प्रकल्पाची देखभाल आता डिजिटाईज होणार आहे. त्यासाठी क्‍लाऊड सेवा वेब प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

मुंबई - बेस्टच्या देयकांचा भरणा, नवीन विजेच्या मीटरची मागणी, विद्युतबिलांची माहिती आणि तक्रार नोंदणी पद्धती आता बेस्टने मोबाईल ऍपद्वारे विकसित केली आहे. दस्तऐवजांचे स्कॅनिंग, नवीन प्रकल्प, त्यांची अंमलबजावणी आणि सध्याच्या प्रकल्पाची देखभाल आता डिजिटाईज होणार आहे. त्यासाठी क्‍लाऊड सेवा वेब प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

बेस्टच्या सर्व विभागांच्या संगणकीकृत प्रणालीचे बेस्ट समितीत नुकतेच सादरीकरण झाले. बेस्टच्या विविध विभागांमध्ये सध्या समन्वयाचा अभाव आहे. बेस्टचे कर्मचारी, प्रवासी आणि ग्राहकांना सेवा-सुविधा तत्पर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. बेस्टच्या एकूण कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे डिजिटायजेशनचा प्रभावी वापर आता केला जाणार आहे. त्यामुळे कार्यक्षमता वाढून ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या आणि तत्पर सेवा देण्यासाठी बेस्टने आता पाऊल उचलले आहेत. कर्मचारी, बस देखभाल परिवहन विभाग, अभियांत्रिकी विभाग, वाहक, चालक आणि कर्मचाऱ्यांच्या रजा पद्धती, अर्थसंकल्प, त्यातील तरतुदी, प्रकल्पांची देखभाल, नवीन वीज मीटरची मागणी, वीज देयके, तक्रार नोंदणी आदी कामकाजाचे डिजिटायजेशन केले जाणार आहे. त्यातील बहुतांश सुविधा मोबाईल ऍपवर मिळणार आहेत. त्याचे सादरीकरण बेस्ट समितीचे सदस्य आणि बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी मनसेचे केदार होंबाळकर, शिवसेनेचे सुनील गणाचार्य, समितीचे अध्यक्ष मोहन मिठबावकर आदींनी काही सूचनाही केल्या. त्यानुसार यंत्रणेत सुधारणा केल्या जाणार आहेत.

बेस्ट होणार पेपरलेस
बेस्ट उपक्रमाच्या दस्तऐवजांचे डिजिटायजेशन आणि स्कॅनिंग करून बेस्टचा कारभार पेपरलेस करण्याचा निर्धार बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी केला आहे. त्याचे काम "नेट स्पायडर' कंपनीला देण्यात येणार आहे. जर्मन यंत्रसामग्रीचा त्यासाठी उपयोग केला जाईल. पालिकेच्या दस्तऐवजांचे स्कॅनिंग आणि डिजिटायजेशन करण्याचे काम याच कंपनीला देण्यात आले आहे. दर मिनिटाला सुमारे 240 दस्तऐवजांचे स्कॅनिंग मशीनमधून केले जात असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Web Title: BEST will be digitalized