बेस्टच्या खासगी बसेसचा हिशोब तपासणार! आर्थिक निकषांची होणार पडताळणी

बेस्टच्या खासगी बसेसचा हिशोब तपासणार! आर्थिक निकषांची होणार पडताळणी

मुंबई : बेस्टने भाडे तत्त्वावर घेतलेल्या एक हजार बसचा हिशोब तपासण्यात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय बेस्ट समितीने घेतला आहे. भाड्याच्या बेस्ट वापरून बेस्टची प्रवाशी संख्या वाढते का? तसेच या बस आर्थिकदृष्ट्या फायद्याचा ठरत आहेत का? याची पडताळणी करण्यात येणार आहे. 

स्वत:च्या बस चालवणे परवडत नसल्याने बेस्टने 1 हजार 99 वातानुकूलित बस भाड्याने घेतल्या आहेत. या बसला प्रत्येक किलोमीटरसाठी बेस्ट प्रशासनाकडून 54 रुपये दिले जातात. या मिनी बस आहे; तर राज्य परिवहन महामंडळाच्या बससाठी बेस्ट उपक्रम प्रत्येक किलोमीटरला 75 रुपये देत आहे. मात्र प्रत्यक्षात बेस्टला स्वत:च्या बस चालवण्यासाठी या पेक्षा जास्त खर्च येतो. त्यामुळे बेस्टने खासगी बस चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता या बसचा फायदा तोटा तपासण्याची वेळ आली आहे. या बसबाबत काही तक्रारी असून अनेक वेळा या बस थांब्यांवर थांबवल्या जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांना त्याचा फायदा होत नाही, असे बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे या बसेस बाबतचा जमा खर्च मागविण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

2022 मध्ये भाड्याच्या बसेसची संख्या तिप्पट वाढणार आहे. एप्रिल 2022 पर्यंत भाडेतत्त्वावरील बसेसची संख्या 3 हजारपर्यंत वाढविण्याचे नियोजन बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. मात्र त्यापूर्वी या बसचा फायदा तोटा तपासून पाहणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. 

2022 मध्ये 6 हजार बस 
बेस्टने 31 मार्च 2022 पर्यंत 6337 हजार बसेसपर्यंत ताफा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात 1 हजार 99 भाडे तत्त्वावरील बससह 3 हजार 875 बस बेस्टच्या ताफ्यात आहेत; तर 300 इलेक्‍ट्रिक बस खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, 600 बस खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच 100 डबल डेकर बसही घेण्यात येणार आहेत. 
BEST will check the accounts of private buses Financial criteria will be verified

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com