पगार न झाल्याने बेस्ट कामगार संतप्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांचा दर महिन्याच्या 10 तारखेला होणारा पगार अजूनही झालेला नाही. तीन दिवसांत पगार न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनने दिला आहे. 

मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांचा दर महिन्याच्या 10 तारखेला होणारा पगार अजूनही झालेला नाही. तीन दिवसांत पगार न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनने दिला आहे. 

बेस्टची स्थिती अत्यंत बिकट झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना या महिन्याचे वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यात असंतोषाचे वातावरण आहे. बेस्ट कंगाल आहे. वित्त संस्थांकडून बेस्टला कर्ज मिळत नाही, अशी माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली. बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी मात्र 24 मार्चपर्यंत वेतन देण्याची ग्वाही दिली आहे. मात्र तीन दिवसांत वेतन न मिळाल्यास बेमुदत संप करण्याचा इशारा युनियनचे नेते शशांक राव यांनी दिला आहे. 

Web Title: Best workers anger