बेस्ट कर्मचारी संपाच्या तयारीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी येत्या 06 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिली आहे.
 

मुंबई - विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी येत्या 06 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिली आहे.

बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प महापालिकेत समाविष्ट करावा, वेतन करार, निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युईटी, मार्च 2016मध्ये वेतन करार संपला तो पुन्हा करावा, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न अशा विविध मागण्यांबाबत बेस्ट कर्मचाऱ्यांनी 06 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली आहे. यापूर्वी 09 जानेवारी 2019ला संपाचे हत्यार उपसले होते. तब्बल 09 दिवस हा संप चालला होता. मात्र, न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर युनियनने संप मागे घेतला.

न्यायालयाच्या आदेशानंतर संप मागे घेताना बेस्ट प्रशासनाने अटीशर्तीची पूर्ततः करण्याबाबत आश्नासन दिले होते.  त्यानंतर आतापर्यंत एकदाही बेस्ट प्रशासनाने युनियनला बैठकीला बोलवले नाही. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे 06 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाचा निर्णय घेतल्याचे राव म्हणाले. तर 07 ऑगस्टला बेस्ट दिन असून दोन वर्षापूर्वी कर्मचाऱ्यांचा संतापाचा उद्रेक झाला होता. आताही 06 ऑगस्टचा संप टाळण्यासाठी प्रशासनाने तोडगा काढावा, अन्यथा संप निश्चित असल्याचा इशारा राव यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BEST Workers may strikes From 06 Augast