

Mumbai
esakal
मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर पालिका प्रशासन किंवा राज्य सरकारकडून कोणताही सकारात्मक निर्णय घेतला जात नसून, उलट हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात झाल्याने आता पालिका कामगार संघटना आक्रमक पवित्र्यात आल्या आहेत. ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना सक्रिय पाठिंबा देण्यासाठी आणि मुंबई महापालिकेतील कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सोमवारी (ता. २२) दुपारी चार वाजता ‘मनपा कामगार संघटना संघर्ष समिती’च्या पदाधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.