ॲपच्या मदतीने सट्टेबाजी करणारे अटकेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

मुंबई : मोबाईल ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अफगाणिस्तान व वेस्ट इंडिज यांच्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोन सट्टेबाजांना डॉ. दा. भ. मार्ग पोलिसांनी अटक केली. विकी जैन (३०) व राजेश जैन (३५) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

ग्रॅंट रोड येथील दुकानात पोलिसांनी सोमवारी छापा टाकून ही कारवाई केली.  आरोपींकडून साडेतीन लाखांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. ॲपच्या सहाय्याने हा सर्व सट्टा चालत असे. त्यात एका पाईंटसाठी २० व काही ॲप्लिकेशनमध्ये एका पॉईंटला ५० ते १०० रुपये असा दर आकारण्यात येत होता. 

web title : betting guy Arrested with the help of an app

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: betting guy Arrested with the help of an app