एकीकडे लसीकरणाला सुरवात, दुसरीकडे सायबर हल्लेखोरही झालेत ऍक्टिव्ह; लोकहो सावधान !

सुमित बागुल
Saturday, 16 January 2021

विघ्नसंतोषी लोकं कधी काही चांगलं होतंय आणि त्याचा गैरफायदा घेऊन आपण लोकांना कधी लुटतोय हेच पाहत असतात.

मुंबई : देशभरात कोरोना लसीकरणाला सुरवात झाली आहे. अशात काही विघ्नसंतोषी लोकं कधी काही चांगलं होतंय आणि त्याचा गैरफायदा घेऊन आपण लोकांना कधी लुटतोय हेच पाहत असतात. आता महाराष्ट्रात आणि देशभरात लसीकरणाला सुरवात झालीये. अशात पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. इतर कुणालाही ही लस घेता येणार नाहीये. ज्यांना लस दिली जाणार आहे त्यांच्या याद्या सरकारने या आधीच तयार केल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला कुणी फोन केला आणि लसीकरणासाठी नोंदणी करत आहोत, असं सांगितलं तर त्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. स्वतः महाराष्ट्राचे गृहमंत्री  अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून ही माहिती देत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

महत्त्वाची बातमी : अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांच्यातील कथित लीक चॅट व्हायरल

महत्त्वाची बातमी :  शिवसेनेच्या बड्या नेत्यावर किरीट सोमय्यांचा पुन्हा हल्लाबोल, केली ED आणि RBI मार्फत चौकशीची मागणी

सायबर हल्लेखोरांपासून सावधान !

राज्यात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. ही मोहीम केंद्रीय यंत्रणेकडून जिल्हा यंत्रणेमार्फत राबविली जात आहे. अशात काही सायबर हल्लेखोर नागरिकांना फोन करून या लसीची नोंदणी करण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी, आधार क्रमांक, पिनकोड आणि इतर वैयक्तिक माहिती विचारत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये, तसेच आपली कोणतीही माहिती सार्वजनिक करू नये, असं आवाहन महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून केलंय. तसेच या फोन कॉल्सची नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये आणि महाराष्ट्र सायबर विभागात तक्रार देखील करा जेणेकरून पोलिस या सायबर हल्लेखोरांवर नियमांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करतील, असंही अनिल देशमुख म्हणालेत.

cybercriminals are trying to dig their claws into people in the name of the COVID19 vaccine anil deshmukh


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beware form cyber criminals as vaccination starts in india says anil deshmukh