गँग्ज ऑफ मुंबई : फेसबुकवरच्या ठगांपासून सावधान

अनिश पाटील
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

मुंबई : नवीन पनवेलमधील एक महिला. नामांकित विद्यालयात मुख्याध्यापिका. एके दिवशी अमेरिकेतील डॅनिअल कॅरी हे त्यांचे फेसबुक फ्रेंड झाले. एका बड्या कंपनीत आपण मोठ्ठ्या हुद्द्यावर आहोत असे त्यांनी सांगितले. समाजमाध्यमांतून येणाऱ्या प्रत्येक माहितीवर डोळे झाकून विश्‍वास ठेवणाऱ्यांच्याच काळातल्या या मुख्याध्यापिका महोदया. कॅरी याने त्यांचा विश्‍वास संपादन केला. शिवाय, तुम्ही तिकडे भारतात काय करताय, इकडे अमेरिकेत या, असे निमंत्रणही दिले. म्हणाले, मोठ्ठ्या पगाराची नोकरी मिळवून देतो तुम्हाला. मग काय शिक्षिकाबाई खुश झाल्या.

मुंबई : नवीन पनवेलमधील एक महिला. नामांकित विद्यालयात मुख्याध्यापिका. एके दिवशी अमेरिकेतील डॅनिअल कॅरी हे त्यांचे फेसबुक फ्रेंड झाले. एका बड्या कंपनीत आपण मोठ्ठ्या हुद्द्यावर आहोत असे त्यांनी सांगितले. समाजमाध्यमांतून येणाऱ्या प्रत्येक माहितीवर डोळे झाकून विश्‍वास ठेवणाऱ्यांच्याच काळातल्या या मुख्याध्यापिका महोदया. कॅरी याने त्यांचा विश्‍वास संपादन केला. शिवाय, तुम्ही तिकडे भारतात काय करताय, इकडे अमेरिकेत या, असे निमंत्रणही दिले. म्हणाले, मोठ्ठ्या पगाराची नोकरी मिळवून देतो तुम्हाला. मग काय शिक्षिकाबाई खुश झाल्या. एके दिवशी कॅरीसाहेबांचा संदेश आला, की तुम्हाला एक छोटीशी भेट पाठवली आहे. म्हणजे त्यात हिऱ्याचे दागिने आहेत. मोबाईल फोन आहे. परफ्युम आहे आणि चॉकलेट वगैरे आहे.

अमेरिकेतील फेसबुक फ्रेंडच्या दिलदारीवर  शिक्षिकाबाई आणखीच खुश झाल्या. त्या किमती वस्तू अशाच फुकटात मिळणार होत्या त्यांना. त्यात एकच अडचण होती. कस्टमची. हे सीमाशुल्कवाले नसते कर लावतात, पण त्या भारी वस्तू फुकटात मिळणार म्हटल्यावर थोडा कर तर भरावाच लागणार. किती रक्कम होती ती? ९५ हजार ते पावणेदोन लाख. वेळोवेळी संदेश यायचा वेगवेगळ्या मोबाईल फोनवरून. सांगितल्याप्रमाणे त्या पैसे भरायच्या. अशा प्रकारे इम्फाळ, दिल्ली, केरळ अशा विविध ठिकाणच्या विविध बॅंक खात्यांमध्ये त्यांनी १८ वेळा पैसे भरले. किती? तर तब्बल ४० लाख. मग किमती भेटवस्तूंची त्या वाट पाहत बसल्या. काही दिवसांनी समजले, की आपल्याला गंडा घालण्यात आला आहे.

गुन्ह्याची ठिकाणे
तुमचे घर आणि तुमचे फेसबुक अकाऊंट

गॅंगची कार्यपद्धत 
वर नमूद केली तशीच. अमेरिकेतील नोकरी, किमती भेटवस्तू यांचे प्रलोभन दाखवायचे. साधारणतः मध्यमवयीन महिलांना गोड बोलून त्यांना गळाला लावायचे आणि मग विमानतळावरून वस्तू सोडवून घेण्यासाठी कर भरा, असे सांगून ऑनलाईन बॅंकिंगद्वारे पैसे मागवून घ्यायचे. त्या बॅंक खात्यांतून लगेचच डेबिट कार्डद्वारे पैसे काढून घ्यायचे. अशा प्रकारे अनेक भारतीयांना आजवर फसवण्यात आले आहे. अशी फसवणूक करणारे हे ठग सहसा देशातीलच असतात. बनावट अकाऊंट चालवतात ते फेसबुकवर. लोक त्यांना फसतात, कारण गोऱ्या कातडीचे आकर्षण आणि फुकटच्या वस्तूंचा हव्यास.

अशी घ्या काळजी...
फेसबुक फ्रेंड म्हणजे खरोखरीचेच मित्र असतात असे समजू नका. प्रलोभनांना बळी पडू नका. असे संदेश आल्यास माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकारांची मदत घ्या. आपल्या घरातील अन्य व्यक्तींना न सांगता अशा प्रकारचे कोणतेही ऑनलाईन व्यवहार करू नका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beware of Thugs on Facebook