Mumbai : डोंबिवली मध्ये ठाकरे गट आक्रमक, राज्यपाल कोशारी यांची हकालपट्टी करण्यासाठी आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा सर्व स्तरातून निषेध होत आहे
Mumbai
Mumbai Sakal

डोंबिवली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. डोंबिवली मध्ये सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून इंदिरा चौक येथे आंदोलन करत राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

राज्यपालांच्या प्रतिमेस जोड्याने मारत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, मंगला सुळे, वैशाली दरेकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल यांसारखे पद भूषविणाऱ्या जबाबदार व्यक्तीने केवळ बोलायचे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी असे विधान करणे चुकीचे आहे. त्यांनी जे वक्तव्य केले त्याला निषेध हा शब्द देखील अपुरा पडेल. त्यांना पदावरून पायउतार करण्यात यावे. त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी यावेळी डोंबिवली शहर प्रमुख खामकर यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com