भगवद्‌गीतेतील श्‍लोकांचा इंद्राणीने केला अनुवाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

मुंबई - स्वतःच्या मुलीच्या हत्येचा आरोप असलेल्या इंद्राणी मुखर्जीने तुरुंगात भगवद्‌गीतेतील तब्बल 700 संस्कृत श्‍लोकांचा इंग्रजीत अनुवाद केला आहे. हे पुस्तक प्रसिद्ध करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मंगळवारी तिने विशेष न्यायालयात केली.

इंद्राणीवर तिची मुलगी शीना बोरा हिची हत्या केल्याचा आरोप आहे. सध्या ती भायखळा तुरुंगात असून, खटला विशेष न्यायालयात सुरू आहे. भगवद्‌गीतेच्या श्‍लोकांच्या अनुवादाचे पुस्तक प्रसिद्ध करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी तिने विशेष न्या. पी. आर. भावके यांच्याकडे केली. यासाठी अर्ज करण्याची सूचना तिला न्यायालयाने केली. या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारे निम्मे उत्पन्न "इस्कॉन'ला आणि निम्मे उत्पन्न भायखळा तुरुंगातील महिला कैद्यांना सुविधा देण्यासाठी खर्च करावे, अशी इच्छाही तिने व्यक्त केली. वडिलांच्या निधनामुळे जामीन मंजूर करण्यासाठी इंद्राणीने अर्ज केला आहे. तिचा पती व उद्योगपती पीटर मुखर्जीनेही काही दिवसांपूर्वी तुरुंगात लॅपटॉप देण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. त्यालाही स्वतःच्या आयुष्यावर पुस्तक लिहायचे आहे. इंद्राणीच्या अर्जावर बुधवारी (ता.21) निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: bhagwatgeeta translated the verses indrani