माजी आमदार भैय्यासाहेब ठाकूर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

काँग्रेसचे नेते व आमदार यशोमती ठाकूर यांचे वडील भैय्यासाहेब ठाकूर यांचे आज पहाटे आजारपणामुळे मुंबईत निधन झाले. सामान्य कुटुंबातून संघर्ष करत पुढे आलेले नेतृत्व म्हणजे भैय्यासाहेब. 

मुंबई : काँग्रेसचे नेते व आमदार यशोमती ठाकूर यांचे वडील भैय्यासाहेब ठाकूर यांचे आज पहाटे आजारपणामुळे मुंबईत निधन झाले. सामान्य कुटुंबातून संघर्ष करत पुढे आलेले नेतृत्व म्हणजे भैय्यासाहेब. 

राजकीय चळवळीला कष्टातून आणि परिश्रमातून विपरीत परिस्थितीत खचून न जाता वारंवार संघर्ष करत राहिल्याने स्थिती बदलू शकते हा विश्वास निर्माण करून देणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते. जमिनीवर ठामपणे उभे राहत सामान्य माणसासाठी लढा देणारे भैय्यासाहेब अमरावती जिल्ह्यातील अग्रणी नेतृत्व होते.

Web Title: Bhaiyyasaheb Thakur dies