भाओजींचा माऊलींशी समस्यांवर दिलखुलास संवाद

बोर्डीत माऊली संवाद उपक्रमाचे उद्घाटन करताना आदेश बांदेकर.
बोर्डीत माऊली संवाद उपक्रमाचे उद्घाटन करताना आदेश बांदेकर.

बोर्डी ः महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना प्रथम प्राधान्य देईल, अशी ग्वाही देऊन महिलांबरोबर सुमारे एक तास दिलखुलास संवाद साधून ग्रामीण भागातील विविध विषय आणि समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न महिलांचे लाडके भाओजी आणि शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी केला. 

ग्रामीण भागातील महिलांना बोलते करून विकासासाठी काय करायला हवे, याबाबतच्या महिलांच्या सूचनांसह, समस्या जाणून घेण्यासाठी मुक्त संवाद घडवून आणण्याच्या दृष्टीने शिवसेना आपल्या दारी या उपक्रमांतर्गत झालेल्या "माऊली संवाद' या समारंभासाठी आदेश बांदेकर येथे आले होते.

सोमवंशी क्षत्रिय समाज उन्नती संघाच्या गजी ताई इ सावे स्मारक सभागृहात सुमारे 400 महिलांशी बांदेकर यांनी या वेळी संवाद साधला. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, पालघर जिल्हा महिला संघटक वैदेही वाढ, ज्योती मेहेर, नमिता राऊत आदी या वेळी उपस्थित होत्या. मुसळधार पाऊस असूनही लाडक्‍या भाओजींबरोबर संवाद साधण्यासाठी ग्रामीण भागातील महिला दूरवरून आल्या होत्या. 

बोर्डीतून उपक्रमाचा मुहूर्त 
तळागळातील महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संकल्पना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची असून आदेश बांदेकर राज्यभर दौरा करणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे या दौऱ्याचा आणि माऊली संवाद या उपक्रमाचा मुहूर्त पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्‍यातील बोर्डी गावातून होत असल्याचे महिला संघटक वैदेही वाढाण यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com