"राज्यातील तीन पक्षाच्या सरकारच्या मुस्काटात आज सणसणीत बसली" - राम कदम

सुमित बागुल
Monday, 16 November 2020

खरंतर ज्यावेळी बिअर बार आणि दारूची दुकाने उघडलीत त्यावेळीच मंदिरांसाठीही नियम तयार करता आले असते - राम कदम 

मुंबई : ठाकरे सरकारकडून आज महाराष्ट्रातील मंदिरे खुली करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी होत होती. त्यानंतर आज दिवाळी पाडव्याला राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली. मंदिरे खुली केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

आज भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम हे सपत्नीक मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. 

Diwali 2020 : ऑनलाईन २१ भाऊरायांना ओवाळत किशोरी पेडणेकरांनी साजरी केली भाऊबीज

पालघर साधू हत्याकांडाचा तपास सरकारने CBI कडे द्यावा, अशी सदबुद्दी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला व्हावी असं साकडं आज सिद्धिविनायकाला घालणार आहोत. आम्ही पालघर साधू हत्याकांड विसरलेलो नाहीत अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्ष नेते आणि आमदार राम कदम यांनी दिली आहे. 

माध्यमाशी बोलताना राम कदम म्हणालेत की, परमेश्वराच्या दरबारात चित्रगुप्त नावाची व्यवस्था असते ही व्यवस्था पाप आणि पुण्याचा हिशेब लिहिते. चित्रगुप्ताच्या दरबारात या सरकारला मोठे शाप मिळणार आहेत. सिद्धिविनायक, साईबाबा, महालक्ष्मी, तुळजाभवानीच्या भक्तांनी या तीन पक्षांना कधीच माफ करू नये, असं आवाहनही राम कदम यांनी यावेळी केलं.

महत्त्वाची बातमी : कोरोनाच्या संकटातून निर्माण झाली संधी, समुद्र प्रदूषण टाळण्यातही खारीचा वाटा

खरंतर ज्यावेळी बिअर बार आणि दारूची दुकाने उघडलीत त्यावेळीच मंदिरांसाठीही नियम तयार करता आले असते. मात्र तेंव्हा सरकार बदल्यांमध्ये गुंतलं होतं. सरकारला मुद्दाम ते करायचं नव्हतं असा आरोपही राम कदमांनी केला. 'राज्यातील तीन पक्षाच्या सरकारच्या मुस्काटात आज सणसणीत बसली आहे आणि हा विजय महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेचा असल्याचंही राम कदम म्हणालेत. 

bharatiya janata party leader and mla ram kadam targets mahavikas aaghadi government


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bharatiya janata party leader and mla ram kadam targets mahavikas aaghadi government