भरतनाट्यम्‌, सतारीने श्रोते मंत्रमुग्ध 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

ठाणे - भरतनाट्यमच्या कलाविष्कारातून प्रकट होणाऱ्या भावना आणि सतारीच्या स्वरांनी पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे दुसरे पुष्प गुंफले गेले. 

पालिकेच्यावतीने आणि अखिल भारतीय मराठी परिषदेच्या ठाणे शाखेच्या संयुक्तविद्यमाने झालेल्या संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचा दुसरा दिवस शुक्रवारी ठाण्याची कॅनडास्थित कन्या सुज्ञा मुळ्ये यांच्या भरतनाट्यम नृत्याने आणि जगविख्यात सतारवादक पं. रवी शंकर यांची ज्येष्ठ शिष्या मंजू मेहता यांच्या सतारवादनाने गाजला. 

कार्यक्रमाची सुरुवात सुज्ञा मुळ्ये यांच्या भरतनाट्यम नृत्याने झाली. त्यांनी सादर केलेल्या गौतम बुद्धाच्या जीवनात आलेल्या स्त्रियांवरील नृत्याने कार्यक्रमाला खूपच रंगत आणली. गौतमाची जन्मदात्री मायावती, बालपणी सांभाळ केलेली त्याची मावशी, ज्ञानप्राप्ती करताना कृश झालेल्या शरीराला खीर देऊन ताकद देणारी सुजाता, आयुष्यभर साथ देणारी पत्नी यशोधरा, बुद्धांच्या विचाराने परिवर्तन झालेली पूर्वाश्रमीची नगरवधू आम्रपाली आणि नंतर त्याची पहिली स्त्री साधिका गौतमी या स्त्रियांच्या वेळोवेळी प्रकट होणाऱ्या भावना मुळ्ये यांनी आपल्या नृत्यातून सादर केल्या. 

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात अहमदाबादच्या सतारवादिका मंजू मेहता यांनी आपल्या सतारवादनाने रसिकांना तृप्त केले. त्यांनी राग रागेश्वरी आणि मालकंस यांचा मिश्र राग चारूकंस मधील विविध आविष्कार सादर करत सतारीची धून वाजवून समारोप केला. या कार्यक्रमाला तबल्याची साथ पं. मुकुंदराज देव यांचे तरुण शिष्य म्हात्रे यांनी दिली. 

Web Title: Bharatnatyam, satarine audience spellbound

टॅग्स