मुंबईत 'एल्गार' मोर्चा सफल

दिनेश चिलप मराठे
मंगळवार, 27 मार्च 2018

संभाजी भिडेंच्या अटकेसाठी आज दुपारी १२ वाजता भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा विधानभवनावर धडकणार होता परंतु  या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अर्थातच मोर्चा आझाद मैदानात आला.

मुंबई : संभाजी भिडेंच्या अटकेसाठी आज दुपारी १२ वाजता भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा विधानभवनावर धडकणार होता परंतु  या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अर्थातच मोर्चा आझाद मैदानात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेकरांचा हा एल्गार मोर्चा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली असल्याने दलित बांधव आपापसातील सर्व मतभेद,गटतट विसरून निळ्या अशोक चक्रांकित ध्वजाखाली एकवटले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे  मुंबई आणि बाहेर गाव तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध भागांतील कार्यकर्ते जमायला सुरूवात झाली होती. आझाद मैदानही कार्यकर्त्यांनी  खचाखच भरले होते.अंगाची लाही लाही करणारी उन्हाची ताप मोर्चातील लोकांचा घसा कोरडा करीत होती.

मोर्चा होता तो खास भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संभाजी भिडे यांना अटक करा, या मागणीसाठीचा. म्हणूनच आज 26 मार्च 2018 ला आझाद मैदानावर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा काढण्यात आला होता.पुणे कोरेगाव भिमा येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यास आलेल्या आंबेडकरी जनतेवर दगडफेक झाली होती.या प्रकरणी पोलिसांनी मिलिंद एकबोटे यांना अटक केली आहे. मात्र संभाजी भिडे यांना अटक करण्यात आलेली नाही.त्यामुळे संतापलेल्या दलित संघटना संभाजी भिड़े यांच्या अटके साठी फारच आक्रमक झाल्या होत्या.त्यांनी 26 मार्चपर्यंत संभाजी भिडेंना अटक करण्यात यावी. अन्यथा 26 मार्चलाच मुंबईत मोर्चा काढू असा अल्टीमेटम इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता.या इशाऱ्या नंतरही संभाजी भिडे यांना अटक झाली नसल्याने आज दुपारी 12 वाजता मुंबईत एल्गार मोर्चा काढण्यात आला होता.मुंबईतील विविध भागांतून तसेच राज्यभरातून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि दलित जनता मोर्चासाठी मुंबईत आली होती.

डॉ. बाबासाहेबांच्या लेकरांचा 'एल्गार' मोर्चा आज हजारोंच्या संख्येने उपस्थित आंबेडकर वादयांनी  सफल केल्याचे दिसून येत होते.एक विशेष म्हणजे मराठा आणि ओबीसी समाजातील लोकही या मोर्च्यात सामील असल्याचे दिसून आले.
जयभीम धड़क l सलामी कडक ll,बाबासाहेब आंबेडकर की जय ll
संभाजी भिडेला अटक झालीच पाहिजे ll अशा गगनभेदी घोषणा दिल्या जात होत्या.प्रचंड उन्हाचा त्रास होत असल्याने तहान भागविण्यासाठी एका टेम्पोतुन खास पाण्याच्या बाटल्या दिल्या जात होत्या. महिला आणि कॉलेज तरुणी खास पांढऱ्या साड्या,चूड़ीदार ल्यायल्या होत्या. निळ्या रंगाच्या ओढण्या,निळ्या टोप्यांमुळे खासी निळाई उठूंन दिसत होती.मोर्चा कव्हर करण्यासाठी पत्रकार, टीव्ही चॅनलच्या पत्रकार आणि सोशल मीडियाचे रिपोर्टर धावाधाव करताना दिसत होते.रिपाई नेते प्रकाश आंबेडकर यांची बाइट घेण्यासाठी व्यास पीठावर मोठी गर्दी उसळली होती.विशेष सेवा आणि सुरक्षा लाठीधारी महिला आणि पुरुष यांच्या "समता सैनिक दलाच्या" सैनिकांनी दिली.एका गोष्टीचे अप्रूप की आजचा मोर्चा अगदी "अहिंसा" मार्गाने पूर्ण झाला.

"आझाद मैदान येथे वरिष्ठ आय़पीएस पोलिस अधिकारी प्रत्यक्ष बंदोबस्तावर होते. पोलिस फोर्सचे नेतृत्व हे मुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारती यांनी केले. अतिरिक्त आयुक्त डॉ. रविन्द्र शिसवे (विशेष शाखा), अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ (दक्षिण प्रादेशिक विभाग), उपायुक्त डॉ. मनोज कुमार शर्मा, डॉ. 
ज्ञानेश्वर चव्हाण, विनायक देशमुख, अखिलेष कुमार सिह, संजय येनपुरे, अशोक दुधे (ट्राफिक), ACP विजय कदम, महिला ACP अश्विनी पाटील, ACP लता दोंदे हे प्रत्यक्ष नजर ठेऊन होते. जवळपास हजार पोलिस अधिकारी आणि अंमलदार,  महिला पोलिस, राखीव पोलिस आणि ब्लैक कमांडो, शीघ्र कृती दल यांचा सहभाग विशेष सुरक्षेत होता."

 

Web Title: Bharip Bahujan mahasangh elgar morcha in Mumbai