डोंबिवली - भावे सांस्कृतीक केंद्राच्या नूतनीकरणाचे भिजत घोंगडे

संजीत वायंगणकर
मंगळवार, 17 एप्रिल 2018

डोंबिवली : पश्चिमेकडील पु. भा.भावे सांस्कृतिक केंद्राची वास्तू जीर्ण झाली आहे. तीचे तातडीने नुतनीकरण न झाल्यास मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती आहे. नगरपालिका काळात 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले पु.भा.भावे सांस्कृतिक केंद्र हे डोंबिवली पश्चिमेकडील एकमेव सांस्कृतिक केंद्र येथील सभागृह गेल्या काही वर्षांपासून सुविधांअभावी विनावापर पडून आहे.

जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अखत्यारीतील जमीन व सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा ताबा यामुळे या इमारतीची पुनर्बांधणी लाल फितीत अडकून आहे. या संदर्भात शिवसेनेचे उपशहरप्रमुख संतोष चव्हाण हे डिसेंबर 2016 पासून पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. चव्हाण यांनी  प्रयत्नांना यश आले असून यासंदर्भात पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सर्व पाठपुरावा दाखवून याप्रकरणी लक्ष घातल्यास पश्चिमेकडे एक आधुनिक व सुविधांनी परिपूर्ण असे सांस्कृतिक केंद्र होऊ शकेल असे सांगितले.

उपशहरप्रमुख संतोष चव्हाण यांनी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदेची भेट घेतली होती. खासदार शिंदे यांनी जूनमध्ये कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ आणि सभागृहनेते राजेश मोरे ह्यांची एकत्रित बैठक घेऊन ह्या संदर्भात माहिती घेऊन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन  यांना सदर विषयाची माहिती दिली. त्यानुसार चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिंदे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी महेंद्रकर कल्याणकर यांच्याशी फोनवर संपर्क करून या वास्तूबाबत माहिती देताना काही सूचना केल्या. सदर इमारतीची पाहणी करून हा प्रश्न तातडीने सोडवू असे आश्वासन दिले. या वास्तूमध्ये विविध दाखल्यांबाबतचे उपकेंद्र , तलाठीचे कार्यालय व १४३ डोंबिवली विधानसभा मतदार नोंदणीचे काम  सध्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर चालते. येथील कर्मचारी वर्ग देखील जीव मुठीत धरुन काम करतात.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नाहरकत मिळताच महापालिकेकडून या सांस्कृतिक केंद्राची पुनर्बांधणीचा मार्ग सुकर होईल. 

Web Title: Bhave Cultural Center renovation is on delay