भावे नाट्यगृहाला लागणार 'दर वाढीचा' प्रयोग!

bhave3.jpg
bhave3.jpg

नवी मुंबई : मराठी नाट्यरसिकांसोबत नाट्यकलांकरांमध्ये आवडते असणारे वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहाचे दरवाढ करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. नाट्यगृहात होणाऱ्या खाजगी संस्थांच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांना थेट दहा ते पंधरा टक्‍क्‍यांची दरवाढ महापालिकेने प्रस्तावित केली आहे. तसेच एक हजार रूपयांपेक्षा जास्त तिकीट आकारणाऱ्या प्रयोगांच्या व्यावसायिक आणि प्रायोगिक नाट्यसंस्थांना थेट दुप्पट भाडे आकारले जाणार आहे.

1997 ला सिडकोतर्फे वाशी शहरात मध्यवर्ती ठिकाणी विष्णूदास भावे नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली. काही काळ सिडकोच्या ताब्यात असलेले नाट्यगृह महापालिकेच्या स्थापनेनंतर त्यामच्या ताब्यात आले. तेव्हा पासून आत्तापर्यंत महापालिकेतर्फे नाट्यगृह चालवण्याचे दर निश्‍चित केले जातात.

मात्र काही वर्षांपासून नाट्यगृहाचे दर न बदलता 'जैसे थे' ठेवण्यात आले होते. नाट्यगृहाचा देखभाल आणि दुरूस्तीचा खर्च पाहता नाट्यगृहातून उत्पन्नापोटी मिळणाऱ्या रक्कमेत मोठी तफावत प्रशासनाला येत होती. ही तफावत पाहता वेळोवेळी नाट्यगृहाच्या भाडेदरात वाढ न केल्याने स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागाने आक्षेप नोंदवले आहेत. त्यामुळे अखेर महापालिकेने भावे नाट्यगृहाचे भाडेदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

ही दरवाढ करताना महापालिकेने ठाण्यातील गडकरी रंगायतन, कल्याणचे आचार्य अत्रे रंगमंदीर व मुंबईतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदीर यांच्या भाडेदराचा विचार केला आहे. प्रशासनाने भाडेदर बदलण्याचा तयार केलेला प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेत मंजूरीसाठी सादर केला जाणार आहे. या सभेत सखोल चर्चेनंतर शिक्कामोर्तब केला जाणार आहे.

खाजगी संस्थांचे खिसेखाली 

आडवाराला सकाळी, दुपारी आणि रात्री असे अनुक्रमे सात हजार पाचशे, नऊ हजार तीनशे पंचाहत्तर आणि आठ हजार दोनशे पन्नास असे दर आकारले जात होते. मात्र आता सूधारीत दरपत्रकानुसार आडवाराला सकाळी, दुपारी आणि रात्री असे अनुक्रमे नऊ हजार, अकरा हजार आणि दहा हजार रूपये आकारले जाणार आहे.

शनिवारी सकाळी, दुपारी आणि रात्री सद्याचे दर नऊ हजार, बारा हजार आणि बारा हजार सातशे पन्नास रूपये आकारले जायचे, आता सूधारीत दरपत्रकानुसार शनिवारी सकाळ, दुपार आणि रात्रीसाठी अनुक्रमे बारा हजार, पंधरा हजार रूपये आकारले जाणार आहेत. रविवारी सकाळ, दुपार आणि रात्री अनुक्रमे सद्याचे दर नऊ हजार, बारा हजार सातशे पन्नास आणि अकरा हजार दोनशे रूपये होते. ते आता सूधारीत दराप्रमाणे अमुक्रमे बारा हजार, वीस हजार आणि पंधरा हजार रूपये करण्यात आले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com