मानवी हक्क आयोगाकडून भायखळा तुरुंगाची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

मुंबई - मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या दोन सदस्यांनी मंगळवारी भायखळा तुरुंगाची पाहणी केली. सायंकाळी उशिरा काही कर्मचाऱ्यांची सदस्यांनी चौकशीही केली. उद्या बुधवारी (ता. 18) आयोगाचे सदस्य हे नागपाडा पोलिस ठाण्यात जाऊन चौकशी करणार आहेत.

भायखळा तुरुंगात गतवर्षी मंजुळा शेट्ये या कैद्याचा मृत्यू झाला होता. मंजुळाच्या मृत्यूनंतर महिला खासदारांसह राज्य बालहक्क आयोगाच्या सदस्यांनी तुरुंगाची पाहणी केली होती. तिच्या मृत्यूप्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण कक्ष 3 कडे सोपविण्यात आला. गुन्हे शाखेने तुरुंगातील सहा जणांना अटक केली होती. त्यांच्याविरोधात पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यासाठी 187 प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यात आले. आता या प्रकरणाची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने दखल घेतली आहे. मंगळवारी सकाळी आयोगाच्या दोन सदस्यांनी तुरुंगाची पाहणी केली. या वेळी कर्मचारी आणि कैद्यांकडेही चौकशी करण्यात आली. घटनास्थळाची पाहणीही करण्यात आल्याचे समजते. सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

Web Title: bhaykhala jail watching