सरकार उलथून टाकण्यासाठी दलितांची माथी भडकवली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

मुंबई - "कोरेगाव भीमा हिंसाचार आणि शहरी नक्षलवादाचा आरोप असलेल्या अरुण फरेरा यांच्यासह अटकेत असलेले सर्व आरोपी माओवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय-माओवादी) या बंदी असलेल्या संघटनेचे सदस्य आहेत. सरकार उलथून टाकण्यासाठी दलितांची माथी भडकवून हिंसाचार घडवण्याचे कट ते आखत आहेत,' असा दावा पुणे पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात केला.

या प्रकरणी पुण्याचे पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत फरेरा यांच्या जामीन अर्जाला विरोध दर्शवला. पुणे पोलिसांनी फरेरा यांच्यासह एकूण आठ जणांना अटक केली आहे. वर्नन गोन्सालवीस, सुधा भारद्वाज, वरवरा राव, गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांच्यावर आरोप ठेवलेले आहेत.

फरेरा आणि गोन्सालवीस यांच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जांवर न्या. पी. एन. देशमुख यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. गोन्सालवीस यांच्या जामीन अर्जावर पुणे पोलिसांनी उत्तर दाखल न केल्यामुळे उच्च न्यायालयाने सुनावणी 5 एप्रिलपर्यंत तहकूब केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhima Koregaon Riot Backward Class Police Government High Court