सुनावणीला उपस्थित न राहण्याची राहुल यांना मुभा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

भिवंडी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी काढलेल्या अनुद्‌गारप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल अवमान याचिकेवर भिवंडी न्यायालयात सोमवारी (ता. 23) सुनावणी झाली. या सुनावणीला राहुल गांधी गैरहजर होते. त्यांना सुनावणीला उपस्थित न राहण्याची मुभा द्यावी, यासाठी त्यांचे वकील ऍड. नारायण अय्यर यांनी सादर केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला.

सोनाळे गावात झालेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. याप्रकरणी कार्यवाह राजेश कुंटे यांनी याचिका केली आहे. सुनावणी वेळी महात्मा गांधी यांच्या हत्येचा संपूर्ण पुरावा न्यायालयात सादर करण्याची मागणीही केल्याचे अय्यर यांनी सांगितले. त्यावर 2 मे रोजी सुनावणी होणार आहे.

Web Title: bhivandi court result rahul gandhi