शेतमजूर महिलेचा भिवंडीत खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

भिवंडी - टेमघर येथील एका 40 वर्षीय शेतमजूर महिलेची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेच्या शरीराचे क्रूरपणे चार तुकडे करून, तिचा मृतदेह दोन गोण्यांमध्ये भरून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अज्ञात मारेकऱ्याने गटारात फेकला होता.

वंशी कोरडे (वय 40) असे मृत महिलेचे नाव आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हारजवळ वंशी यांचे गाव आहे. भिवंडी शहरातील कल्याण रोडवरील टेमघर परिसरात मिळेल ते मजुरीचे काम करून ती राहत होती. अत्यंत क्रूरपणे वंशीला ठार मारून तिचे दोन्ही पाय व हात, धड वेगळे करून, मृतदेह दोन गोण्यांत भरून झाडेझुडपे असलेल्या गटारात फेकला होता. या हत्येप्रकरणी मारेकऱ्यांच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्यंत क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपींचा सुगावा लावण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

Web Title: bhivandi mumbai women murder