esakal | भिवंडीतील टोल नाका आजपासून बंद | toll plaza
sakal

बोलून बातमी शोधा

toll plaza

भिवंडीतील टोल नाका आजपासून बंद

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

भिवंडी : शहरातील मानकोली अंजूरफाटा ते चिंचोटी-वसई महामार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. खराब झालेल्या रस्त्याकडे टोल कंपनीसह (toll company) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी (PWD authorities) दुर्लक्ष केल्याने तालुक्यातील खारबाव ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र पाटील (mahendra patil) यांनी गुरुवारपासून रस्ता दुरुस्ती व टोल नाका बंद (toll plaza closed) करावा यासाठी मालोडी गाव टोल नाक्यावर उपोषण सुरू केले होते.

हेही वाचा: नवी मुंबई: दिघावासीयांची पाण्याची चिंता मिटणार

अखेर हे प्रकरण वाढू नये यासाठी तीन दिवसांनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम इन्फ्रा कंपनीने सरपंच महेंद्र पाटील यांच्या मागण्या पोलिसांच्या उपस्थितीत आज मान्य केल्या. आजपासून टोल वसुलीही बंद केली आहे. याबाबत लेखी पत्र दिल्यानंतर सरपंच पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. आंदोलनात उपसरपंच विशाल पाटील, सदस्य तसेच जिल्हा परिषद सदस्य रत्ना तांबडे, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर टावरे, प्रशांत म्हात्रे सहभागी झाले होते.

loading image
go to top