भिवंडीच्या महापौरपदी कॉंग्रेसचे जावेद दळवी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

भिवंडी - भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या महापौरपदी कॉंग्रेस पक्षाचे जावेद दळवी यांची, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज काटेकर यांची निवड करण्यात आली. त्यांनी भाजप उमेदवारांचा पराभव केला. या वेळी शिवसेना - कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पालिकेच्या बाहेर फटाक्‍यांची अतशबाजी करून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

भिवंडी शहर महापालिकेच्या सभागृहात पालिकेचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या उपस्थितीत व ठाणे उपजिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली खाली आज दुपारी महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात आली. भाजपचे प्रकाश टावरे आणि शिवसेना-कॉंग्रेस आघाडीचे जावेद दळवी यांच्यात थेट लढत झाली. या वेळी कॉंग्रेसचे दळवी यांना समाजवादी पक्ष व शिवसेनेने सहकार्य केले.

Web Title: bhivanid mumbai news jawed dalvi bhivandi mayor