esakal | भिवंडी इमारत दुर्घटनाः ९ वर्षांचा शादीक पोरका,आई- वडिलांसह ३ बहिणींचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडी इमारत दुर्घटनाः ९ वर्षांचा शादीक पोरका,आई- वडिलांसह ३ बहिणींचा मृत्यू

या दुर्घटनेत सुदैवानं 9 वर्षीय शादीक याचा जीव वाचला आहे. या चिमुकल्याच्या आई वडिलांसह तीन बहिणींचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. 

भिवंडी इमारत दुर्घटनाः ९ वर्षांचा शादीक पोरका,आई- वडिलांसह ३ बहिणींचा मृत्यू

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः गेल्या आठवड्यात भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाऊंड येथील जिलानी इमारत कोसळली. या दुर्घटनेत 41 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले. विशेष म्हणजे या भीषण दुर्घटनेत दिड ते पंधरा वर्ष वयोगटातील एकूण 20 चिमुरड्यांचा हकनाक बळी गेला आहे. कुणाचे एक, कुणाचे दोन तर कुणाची तीन तीन मुले या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडली आहेत. मात्र या दुर्घटनेत सुदैवानं 9 वर्षीय शादीक याचा जीव वाचला आहे. या चिमुकल्याच्या आई वडिलांसह तीन बहिणींचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. 

या दुर्घटनेत शादीक खान याचे वडील मोहम्मद मुर्तुजा उर्फ लाला मुस्तफा खान (वय 33 वर्ष ), आई फरीदा बानो मुर्तझा खान ( वय 34 वर्षे  ) बहिणी फरहा  खान ( वय 6 वर्षे  ) फलक  खान ( वय 5 वर्षे  ) रिहा  खान ( वय 3 वर्षे  ) अशा कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. मात्र शादीक हा आपल्या आजीकडे होता त्यामुळे तो बचावला आहे. 

शादीक आणि त्याचे कुटुंबीय रात्री आजीच्या घरी जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर रात्री एकच्या सुमारास सर्वजण घरी जाण्यासाठी निघाले मात्र शादीक आपल्या आजीकडेच राहण्याचा हट्ट धरला. त्यामुळे त्याची आजी मजलैन बनो यांनी आज माझ्याकडे राहा उद्या जा असे शादीकला सांगितलं. त्यामुळे शादीक आजीकडेच राहिला आणि त्याचे आई वडील आणि तीन बहिणी घरी आले. मात्र रात्री तीनच्या सुमारास इमारत कोसळली. 

शबनम मोहम्मद अली शेख ( 12वर्ष ) 
हसनैन आरिफ शेख ( 3 वर्ष )
आरीफा मुर्तुजा खान ( ३ वर्ष ) 
जैद जाबीर अली शेख ( 5वर्ष )
जुनैद जबीर अली शेख ( दिड वर्ष ) 
मरियम शब्बीर कुरेशी ( 12 वर्ष ) 
पलकबानो मो. मुर्तुजा खान ( 5वर्ष ) 
फराह मो. मुर्तुजा खान ( 6 वर्ष )
शबाना जाबीर अली शेख ( 3वर्ष ) 
रिया खान ( 3 वर्ष ) 
फातिमा बब्बू सिराज शेख ( वय 2 वर्ष )
फुजेफा जुबेर कुरेशी ( वय 5 वर्ष )
आकसा मोहम्मद आबिद अंसारी ( 14 वर्ष ) 
मोहम्मद दानिश आदिल अंसारी ( 11 वर्ष ) 
फायजा जुबेर कुरेशी ( वय 5 वर्ष ) 
आयशा कुरेशी ( 7 वर्ष ) 
फातमा जुबेर कुरेशी ( 8 वर्ष )
अफसाना अंसारी ( 15 वर्ष ) 
असद शाहिद खान ( अडीच वर्ष ) 
निदा आरिफ शेख ( 8 वर्ष )

अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चिमुरड्यांची नावे आहेत . धोकादायक ठरविलेल्या या इमारतीत अनेक कामगार आणि मजूर परिवार आपल्या परिवारासह राहत होती. पैशानीची चणचण आणि कमी भाडे असल्याने या इमारतीत अनेक जण भाड्यानं राहत होती. मात्र हेच कमी भाडे आपल्या आणि आपल्या परिवाराची राख रांगोळी करेल असा विचार येथील रहिवाशांना आला नाही हेच मोठे दुर्दैव ठरले आहे.

Bhiwandi building accident 9 year old Shadik parents and three sisters died

loading image
go to top