भिवंडी इमारत दुर्घटनाः मृतांचा आकडा १८ वर, पालिकेचे दोन अधिकारी निलंबित

पूजा विचारे
Tuesday, 22 September 2020

सोमवारी पहाटे भिवंडीतील पटेल कंपाउंड परिसरातील जिलानी ही तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेतील मृतांची संख्या १८ वर पोहोचली आहे.तर २५ जण जखमी झालेत. मृतांमध्ये सात मुलांचा समावेश आहे.

मुंबईः सोमवारी पहाटे भिवंडीतील पटेल कंपाउंड परिसरातील जिलानी ही तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेतील मृतांची संख्या १८ वर पोहोचली आहे.तर २५ जण जखमी झालेत. मृतांमध्ये सात मुलांचा समावेश आहे. जवळपास ४० वर्ष जुन्या या इमारतीत ४० कुटुंबे राहत होती. महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा समावेश होता. ही इमारत रिकामी करण्याची नोटीसही महापालिकेने बजावण्यात आली होती. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

या दुर्घटना प्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी पालिकेचे तत्कालीन प्रभाग समितीचे 3 चे सहाय्यक आयुक्त आणि प्रभाग इंजिनिअर अशा दोघांना सोमवारी संध्याकाळी तातडीने निलंबित केले आहे. सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव आणि अभियंता दुधनाथ यादव असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. सदर अधिकाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचा प्राथमिक ठपका ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आयुक्त डॉ.आशिया यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे दिले आहेत.

एकूण १८ मृत व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे

१) झुबेर खुरेशी(पु/३० वर्ष)
२)फायजा खुरेशी(पु/५वर्ष)
३)आयशा खुरेशी(स्री/७वर्ष)
४)बब्बू(पु/२७वर्ष)
५) फातमा जुबेर बबु (स्त्री/२वर्ष)
६) फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/८वर्ष)
७) उजेब जुबेर (पु/६ वर्ष)
८) असका आबिद अन्सारी (पु/१४ वर्ष)
९) अन्सारी दानिश अलिद (पु/१२ वर्ष)
१०) सिराज अहमद शेख (पु/२८ वर्ष)
११) नाजो अन्सारी (स्त्री/२६)
१२) सनी मुल्ला शेख (पु/७५)
१३) अस्लम अन्सारी (पु/३०)
१४) नजमा मुराद अन्सारी (स्त्री/५२)
१५) आमान इब्राहिम शेख (पु/२२)
१६) अफसाणा अन्सारी (स्त्री/१५)
१७) शाहिद अब्दुला खान (स्त्री/३२)
१८) असद शाहिद खान (पु/३ वर्ष)

संध्याकाळी 6:15 वाजेपर्यंत सुखरूप सुटका करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे

१) हेदर सलमानी( पु/२०वर्ष)
२) रुकसार खुरेशी(स्त्री/२६ वर्ष)
३) मोहम्मद अली(पु/६० वर्ष)
४) शबीर खुरेशी(पु/३० वर्ष)
५) मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/४५ वर्ष)
६) कैसर सिराज शेख (स्त्री/२७ वर्ष)
७) रुकसार जुबेर शेख ( स्त्री/ २५वर्ष)
८) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/१८ वर्ष)
९) आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/२२ वर्ष)
१०) जुलेखा अली शेख (स्त्री/५२ वर्ष)
११) उमेद जुबेर कुरेशी (पु/४वर्ष)
१२) आमीर मुबिन शेख (पु/१८ वर्ष)
१३) आलम अन्सारी (पु/१६ वर्ष)
१४)अब्दुला शेख(पु/८वर्ष)
१५) मुस्कान शेख(स्री/१७वर्ष)
१६) नसरा शेख(स्त्री/१७वर्ष)
१७) इंब्राहिम(पु/५५वर्ष)
१८)खालिद खान(पु/४० वर्ष)
१९) शबाना शेख(स्त्री/५०वर्ष)
२०) जारीना अन्सारी (स्त्री/४५)

तसेच याबाबत अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली इमारत दुर्घटना प्रकरणी एक चौकशी समिती स्थापन केलेली आहे. त्यामध्ये सहाय्यक नगररचनाकार प्रल्हाद होगे पाटील, उपायुक्त दिपक सावंत,शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून चौकशी करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश आयुक्त डॉ. आशिया यांनी दिले आहेत.

Bhiwandi building collapse incident Death toll rises 18 Thane Municipal Corporation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhiwandi building collapse incident Death toll rises 18 Thane Municipal Corporation