भिवंडी महापालिकेत सहा हजारांचा बोनस 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

भिवंडी - भिवंडी महापालिकेची आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे विकासकामांना मर्यादा आली असतानाही कामगारांची दिवाळी आनंदात जावी, यासाठी महापालिकेने सहा हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. 

महापौर जावेद दळवी व आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. त्याचबरोबर महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी थकीत मालमत्ता करवसुलीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन महापौर दळवी यांनी केले. दरम्यान, 13 हजारांहून बोनसची रक्कम थेट सहा हजार रुपयांवर आल्यामुळे कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: bhiwandi municipal corporation diwali bonus

टॅग्स