विरोधी पक्षनेतेपदी भिवंडीत भाजपचे श्‍याम अग्रवाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

भिवंडी - भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर झालेल्या पालिकेच्या पहिल्याच महासभेत सभागृहनेते म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रशांत लाड; तर विरोधी पक्षनेतेपदी भाजपचे नगरसेवक श्‍याम अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. पालिकेच्या मुख्य सभागृहात महापौर जावेद दळवी यांच्या अध्यक्षतेखाली महासभा झाली. 

पालिका निवडणुकीत काँग्रेसने ४७ जागांसह बहुमत मिळवले असले तरी त्यांनी भाजप व विलास पाटील यांच्या कोणार्क विकास आघाडीला शह देणयासाठी शिवसेनेशी आघाडी केली आहे. महासभेतही स्थायी समिती सदस्य व गटनेतेपदाची निवड झाली असली तरी विरोधी गटाने स्थायी समिती सदस्यसंख्येच्या बळावर सहा जागा मिळवून काँग्रेस-शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. समाजवादीचे नगरसेवक व आरपीआय नगरसेवकांनी कोणार्क विकास आघाडी गटाला समर्थन दिल्याने गटनेते विलास पाटील यांनी अब्बास अली अन्सारी, विकास निकम या दोन नगरसेवकांना स्थायी समितीचे सदस्यपद दिले आहे. काँग्रेसच्या गटनेतेपदी हलीम मो. हारून अन्सारी, शिवसेना गटनेतेपदी संजय म्हात्रे, भाजपच्या गटनेतेपदी नीलेश चौधरी, कोणार्क विकास आघाडीच्या गटनेतेपदी विलास आर. पाटील आदींची नियुक्ती महापौरांनी जाहीर केली आहे. स्थायी समितीच्या सदस्यपदी काँग्रेसचे इमरान वली मो. खान, फराज अंजूम बहाउद्दीन, रसिका प्रदीप राका, जावेद दळवी तलहा शरीफ हसन मोमीन, तफज्जुल अन्सारी, झाकीर मिर्झा, मुख्तार मोहम्मद अली खान, भाजपचे सुमित पाटील, प्रकाश पाटील, संतोष शेट्टी, नित्यानंद नाडर, शिवसेनेचे मदन बुवा नाईक, संजय म्हात्रे, कोणार्क विकास आघाडीचे अब्बास अली अन्सारी, विकास निकम आदींची निवड झाली आहे. महासभेत विविध पक्षांच्या नगरसेवकांच्या विविध पदांवर नियुक्‍त्या झाल्यानंतर महापौर दळवी, उपमहापौर मनोज काटेकर, अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब आदींनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

Web Title: Bhiwandi news Bhiwandi-Nizampur Municipal Corporation bjp