भिवंडीत महिलेकडून प्रियकराची हत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

भिवंडी - शरीरसंबंधास नकार देणाऱ्या प्रेयसीने तिच्या नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजेश आडेप (वय २८) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी काव्या विनोद नाडीकटला (२८) हिला अटक करण्यात आली आहे. तिला भिवंडी न्यायालयाने २ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सुरुवातीला भिवंडी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती; मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर राजेशचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे सिद्ध झाल्याने कारवाई करण्यात आली.

Web Title: bhiwandi news crime murder