साथीच्या आजारांचे थैमान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

भिवंडी - भिवंडी शहर महापालिका क्षेत्रात पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. सर्वत्र कचरा, घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जंतूनाशक औषध फवारणी होत नसल्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. नागरिक मुख्य लेखा परीक्षक विनोद शिंगटे यांना प्रशासकीय कामाचा अनुभव नसताना आयुक्तांनी त्यांना मुख्यालय उपायुक्तांचा कार्यभार देऊन पदाची थट्टा केली आहे. महापौर जावेद दळवी यांनी याची गंभीर दखल घेत शिंगटे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कोणार्क विकास आघाडीचे गटनेते विलास पाटील यांनी महासभेत केली.

भिवंडी - भिवंडी शहर महापालिका क्षेत्रात पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. सर्वत्र कचरा, घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जंतूनाशक औषध फवारणी होत नसल्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. नागरिक मुख्य लेखा परीक्षक विनोद शिंगटे यांना प्रशासकीय कामाचा अनुभव नसताना आयुक्तांनी त्यांना मुख्यालय उपायुक्तांचा कार्यभार देऊन पदाची थट्टा केली आहे. महापौर जावेद दळवी यांनी याची गंभीर दखल घेत शिंगटे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कोणार्क विकास आघाडीचे गटनेते विलास पाटील यांनी महासभेत केली. प्रशांत लाड, मतलुब सरदार यांच्यासह अन्य नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिला. 

भिवंडी पालिकेची प्रथमच महापौर जावेद दळवी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य सभागृहात महासभा झाली. उपमहापौर मनोज काटेकर, अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सरकारने विनोद शिंगटे यांना मुख्य लेखा परीक्षक म्हणून काम करण्यासाठी पाठवले असताना आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी त्यांच्याकडे आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा आणि पालिकेचे मुख्यालय उपायुक्त म्हणून कार्यभार दिला आहे. या कामाचा अनुभव नसल्याने नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे, असा आरोप गटनेते पाटील यांनी केला. शहरात स्वाईन फ्लू आणि डेंगीने थैमान घातले असून, २१ जणांना डेंगी, तर तिघांना स्वाईन फ्लू सदृश्‍य तापाच्या आजाराची लागण झाली आहे. भिवंडी, ठाणे, मुंबई येथील विविध खासगी रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. 

भिवंडी महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, गटार-नाले तुंबल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याकडे पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याने शहरात साथीचे रोग फैलावत असल्याचा आरोप उपमहापौर काटेकर यांनी केला.

आरोग्य विभागाकडून डेंगीच्या नियंत्रणासाठी नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. आठ-आठ दिवस पाण्याने भरलेले घराजवळील प्लास्टिकचे ड्रम स्वच्छ करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला तुंबलेल्या सांडपाण्याच्या गटारांची साफसफाई हाती घेण्यात आली आहे. आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना उपायुक्तपदाचा कार्यभार दिला असून, नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रशासन काम करत आहे.
- विनोद शिंगटे, उपायुक्त, महापालिका

विविध प्रभागांत स्वच्छता मोहीम व जंतूनाशक औषध फवारणी करण्याचे आदेश दिले आहेत. अधिकारी व कर्मचारी काम करण्यात हलगर्जीपणा करत असल्यास निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आज दुपारी तातडीने अधिकारी व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या शेट्टी यांची बैठक घेऊन त्यांना आजारी रुग्णांचा सर्व्हे करा, आरोग्य तपासणी शिबिरे भरवा, अशा सूचना केल्या आहेत.
- जावेद दळवी, महापौर

Web Title: Bhiwandi news municipal corporation disease