भिवंडीत बुधवारी 24 तास पाणी कपात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

भिवंडी - ऐन रमजानमध्ये उपवासाच्या (रोजाच्या) काळात स्टेम प्राधिकरणने पंप दुरुस्तीच्या निमित्ताने 24 तास पाणी कपात जाहीर केल्याने शहरातील मुस्लिम समाजासह इतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. स्टेम प्राधिकरणाने केलेली 24 तासांची पाणी कपात भिवंडी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता एल. पी. गायकवाड यांनी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. तीव्र उन्हाळ्यात पाणी कपातीबरोबर आता दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने महिलांना मुबलक प्रमाणात पाणी साठवून ठेवावे लागणार आहे. 

दरम्यान, आयुक्त मनोहर हिरे यांनी तातडीची गरज भासल्यास टॅंकरद्वारे मागणीनुसार पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्‍वासन दिले आहे. 

भिवंडीत रमजाननिमित्त नागरिकांचे रोजचे उपवास आहेत. या दरम्यान पाण्यास फार महत्त्व दिले जाते. सकाळपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत काहीही न खाता, पिता हा उपवास केला जातो. सायंकाळी हा उपवास सोडताना प्रथम खजूर आणि पाणी घेतले जाते. ही बाब मुस्लिम समाजाने पोलिसांनी घेतलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्या वेळी रमजानच्या काळात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन पाणीपुरवठा विभागाने दिले होते. असे असताना अचानक भिवंडीतील पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार असल्याची माहिती पालिकेच्या कार्यकारी अभियंत्याने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. उल्हासनदीच्या पाणी नियोजनांतर्गत दर बुधवारी स्टेमकडून पाणी वितरण बंद करण्यात येत आहे. शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेममधील पंप हाऊसमधील मशिनरी दुरुस्तीचे काम तातडीने करावयाचे आहे. तसेच शहाड पंपहाऊस, टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील पावसाळ्यापूर्वी करावयाची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी स्टेम वॉटर डिस्ट्रीट अँड इन्फ्रा. कंपनीतर्फे बुधवारी (ता. 30) सकाळी 9 ते गुरुवार (ता. 31) सकाळी 9 पर्यंत 24 तास हे दुरुस्ती काम सुरू राहणार आहे. या काळात शहराला पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे. 

Web Title: Bhiwandi news Water shortage by 24 hours on Wednesday