esakal | भिवंडी : अनधिकृत ३५० नळ जोडण्या खंडित
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

भिवंडी : अनधिकृत ३५० नळ जोडण्या खंडित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : कांवे गावातील गावकऱ्यांनी पाणी चोरीच्या प्रश्नावर थेट मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयात (Court) धाव घेऊन याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने स्टेम उच्च प्राधिकरणाला कारवाईचे आदेश दिल्याने मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात येत आहे. नुकतीच १०० हून अधिक अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यात आली.

आत्तापर्यंत प्राधिकरणाने ३५० अनधिकृत नळडोडण्या खंडित केल्या आहेत. मोठ्या जलवाहिन्यांतून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येतो त्या जलवाहिन्या फोडून शेकडो अनधिकृत नळ जोडणी झाल्याने कांब गावातील ग्रामस्थांना सुरळीतपणे पाणी मिळत नाही. याप्रश्नी न्यायालयात याचिका केली. पाणी चोरीची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने पाणी चोरीबाबतीत नाराजी व्यक्त करीत अनधिकृत नळजोडण्या काढून टाकण्याचे निर्देश दिले आणि कांव गाव ग्रामस्थांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे आदेश स्टेम प्राधिकरण प्रशासनाला दऊन कामाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा: ..त्यामुळे राज ठाकरेची पन्नास भाषणं ऐकणार! - चंद्रकांत पाटील

त्यामुळे स्टेम प्राधिकरण विभागाचे अनिल चौधरी, अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नळजोडण्या खंडित करण्याची धडक कारवाई सुरू झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून खोणी, काटई, कांवे या ग्रामपंचायत क्षेत्रासह भिवंडी पालिका हद्दीतील मिल्लत नगर, नवीवस्ती, फेणापाडा, कामतघर, नारपोली या परिसरात पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात कारवाईस सुरुवात केली आहे. आजपर्यंत झालेल्या कारवाईत तब्बल ३५० नळजोडण्या तोडण्यात आल्या आहेत.

loading image
go to top