नक्की पाहा : बच्चेकंपनीने साकारला जलदुर्ग तर वसईमध्ये रांगोळ्या झाल्यात जिवंत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

दिवाळी म्हटलं की बच्चकंपनीसाठी किल्ले बनवण्याची अनोखी पर्वणी. आपल्या तल्लख बुद्धीने ही मंडळी महाराजांचं किल्लेरुपी साम्राज्य छोट्या रुपात साकारतात. असाच एक किल्ला सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या बच्चेकंपनीनं जमिनीवर नाही तर चक्क पाण्यात किल्ला साकारलाय. हा जलदुर्ग पाहुन छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्त्वाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

भिवंडीतल्या पायगाव इथं बच्चेकंपनीनं सिंधुदुर्गच्या अभेद्या किल्ल्याची प्रतिकृती साकारलीय. ही पाहुन कुणाच्याही अंगात शिवरायांबद्दलचा अभिमान संचारल्याशिवाय राहत नाही.

महाराष्ट्रातलं रांगोळीचं माहेरघर वसई. दिवाळीनिमित्त वसईतल्या रांगोळी कलाकारांनी आपल्या कलेचं अनोखं प्रदर्शन केलंय. जिवंत वाटणाऱ्या प्रतिकृती या कलाकारांनी रांगोळीच्या माध्यमातून साकारल्या आहेत. सालाबादप्रमाणं यंदाही जुचंद्र गावात विविध विषयांवर रांगोळ्या साकारण्यात आल्या.

Image may contain: 1 person, text

Image may contain: food

Image may contain: one or more people and people sleeping

No photo description available.

Image may contain: 1 person, text

Image may contain: 1 person, text

Image may contain: phone

शिवछत्रपती समाजसेवा मंडळातर्फे या रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी संस्कार भारती, थ्रीडी रांगोळी. निसर्गचित्र, पोर्ट्रेट रागोळी, कणा रांगोळी अशा विविध रांगोळ्या पाहायला मिळाल्या. महिला अत्याचार, मासिक पाळी, शेतकरी आत्महत्या, प्लास्टिक बंदी, व्यसनमुक्ती, आरेतील झाडांची कत्तल यासह अनेक विषयांवर कलाकारांनी आपली कला सादर केली.

Webtitle : bhiwandi water fort and vasai amazing rangoli

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhiwandi water fort and vasai amazing rangoli