'कोरोना'मुळे जग कोमात, भोजपुरी गाणी मात्र जोमात.. 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 March 2020

मुंबई : कोरोनामुळे अवघं जग संकटात सापडलं आहे. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. एकीकडे कोरोनामुळे भारतात भीतीचं वातावरण आहे. मात्र दुसरीकडे भोजपुरी इंडस्ट्री कोरोनामुळे चांगलीच जोमात आहे. कोरोनाचं नाव वापरुन भोजपुरीमध्ये निरनिराळ्या प्रकारचे गाणे तयार केले जात आहेत. ही गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतारतायत. 

मुंबई : कोरोनामुळे अवघं जग संकटात सापडलं आहे. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. एकीकडे कोरोनामुळे भारतात भीतीचं वातावरण आहे. मात्र दुसरीकडे भोजपुरी इंडस्ट्री कोरोनामुळे चांगलीच जोमात आहे. कोरोनाचं नाव वापरुन भोजपुरीमध्ये निरनिराळ्या प्रकारचे गाणे तयार केले जात आहेत. ही गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतारतायत. 

हेही वाचा: कोरोनाची दहशत ! नवी मुंबईत चीनी नागरिकांची शोधमोहीम..   

कोरोना आता भारतात शिरकाव करणार असल्याची एकीकडे भीती आहे. मात्र याच कोरोनावर भोजपुरी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक गाणी बनवली जातायत. कोरोनावर काही म्युझिक अल्बम भोजपुरीमद्धे बनवण्यात आले आहेत. कोरोना हा ताजा विषय असल्यामुळे हे अल्बम प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीला उतरले आहेत. लाखो लोकांनी या अल्बमला पसंती दिली आहे. 

कोरोनाच्या गाण्यांवर अभिनेते आणि अभेनेत्रीही प्रभावित होतात आहे. भोजपुरीमद्धे देशभक्तीपर गाणी बनवणाऱ्या गोविंद बार्बर यांनी देखील कोरोनावर गाणं तयार केलंय. देवी-देवतांची गाणी देखील कोरोनाचा संदर्भ घेऊन तयार करण्यात आली आहेत. यात देवी आम्हाला कोरोनापासून वाचव अशी प्रार्थना करण्यात आली आहे. काही गाण्यांमद्धे लोकांना कोरोनापासून बचाव करण्याचे उपाय सुचवले आहेत.  तर काहींनी थेट पंतप्रधान मोदींना कोरोनापासून वाचवा असं आवाहन करणारं गाणं तयार केलंय. थोडक्यात काय तर लोकांना सुचेल आणि पटेल तशी गाणी कोरोनावर तयार होत आहेत.

हेही वाचा: कोरोनामुळे मुंबईतील रुग्णालयात औषधांचा तुटवडा   

कोणती आहेत ही भोजपुरी गाणी

  • कोरोना वायरस से माई बचईय. 

NBT

  • लहंगा में कोरोना वायरस.. 
  • मोदी जी बचाई फईलल करोना वायरस से.. 
  • हॅलो कौन, कोरोना व्हायरस  

NBT

कोरोनासारखी गंभीर समस्या आली तरी भारतात लोकं त्यातूनही आपला आनंद शोधतायात हेच या सगळया भोजपुरी अल्बमच्या माध्यमातून बघायला मिळतंय. 

bhojpuri music industry made music albums on Corona virus


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhojpuri music industry made music albums on Corona virus