esakal | मोठी बातमी! राज्य सरकारचा मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय; घर खरेदीदारांना दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी! राज्य सरकारचा मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय; घर खरेदीदारांना दिलासा

राज्यातील जनतेची क्रयशक्ती वाढवण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील मुद्रांक शुल्क कमी करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे गृह खरेदीरांना दिलासा मिळाला आहे.

मोठी बातमी! राज्य सरकारचा मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय; घर खरेदीदारांना दिलासा

sakal_logo
By
सिद्धेश्‍वर डुकरे


मुंबई : जगभर थैमान घातलेल्या कोरोना साथीमुळे आर्थिक कंबरडे मोडले असताना राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने सुरू केला आहे.त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील जनतेची क्रयशक्ती वाढवण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील मुद्रांक शुल्क कमी करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे गृह खरेदीरांना दिलासा मिळाला आहे.

अविनाश ढाकने राज्याचे नवीन परिवहन आयुक्त; तर  शेखर चन्ने एसटीचे नियमीत व्यवस्थापकीय संचालक

 ही मुद्रांक शुल्क आकारणी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्र,शहरी तसेच ग्रामीण भाग यासाठी एका ठराविक कालासाठी घटवण्यात आली आहे.
    त्याला अनुसार सध्याचा प्रचलित मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  अभिहस्तांतरणपत्राच्या दस्तावरील प्रचलित मुद्रांक शुल्काचा दर दि.1 सप्टेंबर, 2020 पासून ते दि.31 डिसेंबर, 2020 या कालावधीकरिता 3% ने तर दि.1 जानेवारी, 2021 ते दि.31 मार्च, 2021 या कालावधीकरिता 2% ने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ग्रामीण भागात मुद्रांक शुल्क 4 टक्के व जिल्हा परिषद अधिभार(सेस) 1 टक्का असे एकूण 5 टक्के आकारला जात आहे.तर तो 31 डिसैंबर 2020 पर्यत 3 टक्के कमी करून तो 2 टक्के इतका लागू केला आहे.तर 31डिसैंबर ते मार्च 2021 पर्यत एक टक्का वाढवून तीन टक्के इतका लागू केला जाणार आहे.

शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्याच्या वैद्यकीय अहवाल प्रती कुटूंबियांना द्या;उच्च न्यायालयाचे निर्देश

ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागात सध्या मुद्रांक शुल्क 5 टक्के व स्थानिक स्वराज्य संस्था कर 1 टक्के आसा 6 टक्के इतके शुल्क आहे.ते 31डिसेंबर 2020 पर्यत 3 टक्के कमी करून 3 टक्के  आकारले जाणार आहे.मात्र 31 डिसेंबर ते मार्च 2021 अखेरपर्य यात 1 टक्के वाढ होऊन ते 4 टक्के शुल्क आकारले जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना स्थावर मालमत्ता खरेदी करताना दिलासा मिळणार आहे.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top