आर्च बिशप यांच्या पत्रामागे भाजपची हिंदू मतांसाठी मोठी राजकीय खेळी - ख्रिस्ती महासंघ 

दिनेश चिलप मराठे
रविवार, 27 मे 2018

आर्च बिशप यांच्या पत्रामागे भाजपची हिंदू मतांसाठी मोठी राजकीय खेळी असल्याचा आरोप अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी केला आहे. दिल्ली आर्च बिशप रेव्ह. अनिल कुट्टो यांच्या दिल्ली धर्मप्रातांतील फादरला लिहलेल्या पत्राने चांगलेच राजकीय वळण घेतले आहे. भाजप व संघ परिवाराने यावर कठोर टिका केलेली आहे. प्रतिक्रिया देताना अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी भाजपने या पत्राचे भांडवल करून हिंदू मत एकत्र करण्याचा केवलवाणा प्रयत्न केलेला आहे.
 

मुंबादेवी - आर्च बिशप यांच्या पत्रामागे भाजपची हिंदू मतांसाठी मोठी राजकीय खेळी असल्याचा आरोप अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी केला आहे. दिल्ली आर्च बिशप रेव्ह. अनिल कुट्टो यांच्या दिल्ली धर्मप्रातांतील फादरला लिहलेल्या पत्राने चांगलेच राजकीय वळण घेतले आहे. भाजप व संघ परिवाराने यावर कठोर टिका केलेली आहे. प्रतिक्रिया देताना अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी भाजपने या पत्राचे भांडवल करून हिंदू मत एकत्र करण्याचा केवलवाणा प्रयत्न केलेला आहे.

आता हिंदू बांधवांनाही कळून चूकले आहे की, देशात धर्माच्या नावावर विचित्र राजकारण सूरू आहे. याविषयी अनेक महाराजही बोलले आहेत. चर्च मध्ये रोजच भारत देश, राष्ट्रपती, पंतप्रधान व सर्व पदाधिकारी यांच्यासाठी प्रार्थना केली जाते व वेळोवेळी बिशप पत्र काढून वेगवेगळ्या विषयांसाठी प्रार्थना करावयास सांगतात त्यात गैर काय? नाहीतर सध्या कोणता धर्म व कोणता वर्ग समाधानी आहे? प्रत्येक जण हे सरकार जावे यासाठी आस धरून आहे. सबका साथ, सबका विकास म्हणायचे आणि अल्पसंख्खाक व दलितावर अन्याय करायचा. याला धर्मनिरपेक्षता म्हणायचे का? हे सरकार ने सांगावे? महाराष्ट्रात तर पूर्ण वेळ अल्पसंख्यांक मंत्री नाही, महाराष्ट्र अल्पसंख्खाक आयोगाची एक ही जागा भरलेली नाही, अल्पसंख्यांक जिल्हा सनियंत्रण समिती यांनी भरलेली नाही. तर हे न्याय काय देणार? 8 व 9 मेला आझाद मैदानावर मोठे ख्रिस्ती हक्क आंदोलन झाले शिष्टमंडळाला साधी भेट मुख्यमंत्री साहेबांनी दिली नाही ही ख्रिश्चन समाजा विषयी किती कठोरता यांच्या मनात आहे. भारत देश आमचाही आहे. यास कोणी लेबल लावण्याचा प्रयत्न करू नये. आज दहशत एवढी की ख्रिश्चन धर्मियांना प्रार्थने पासून रोखणे, येशू ची प्रार्थना करणारास वाळीत टाकणे असे अनेक प्रकार दररोज घडतायत तेव्हा हे सरकार काय करत आहे? हे समजत नाही. माझे स्पष्ट मत आहे की, भाजप स्वतः महाराजांना मंत्री करते आणि आमच्या बिशपांनी धर्मनिरपेक्ष चांगले नविन सरकार यावे म्हणून प्रार्थना करा, म्हटले तर काय बिघडले? भाजपाला पून्हा सत्तेत यायचे असेल तर अल्पसंख्खाक व दलीतांना सर्व क्षेत्रात न्याय द्यावा व हिंदूत्ववादी चेहरा सोडून त्यास धर्मनिरपेक्ष भारतीय चेहरा बनवावे तर आपण सत्तेत टिकाल. कारण, देशात आज प्रत्येक जण आपल्या धर्माच्या रक्षणासाठी संघर्ष करताना दिसतोय. विकासाचे नाही तर हे  भविष्यातील अराजकते लक्षण दिसतेय. असेही ते यावेळी म्हणाले.

Web Title: The big political slogan of BJP's Hindu votes after the letter of Arch Bishop