बापरे बाप! महिलेच्या गर्भाशयात कलिंगडाएवढा ट्युमर; खारघरमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

बापरे बाप! महिलेच्या गर्भाशयात कलिंगडाएवढा ट्युमर; खारघरमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई  : एका महिलेच्या गर्भाशयातून चक्क कलिंगडाच्या आकाराचा ट्युमर काढण्यात आला आहे. हा ट्युमर काढण्याची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. गर्भाशयाच्या डाव्या बाजूला तीन किलो वजनाचा हा ट्युमर आढळून आला होता. 
लॉकडाऊनदरम्यान महिलेला वाढलेले पोट आणि वायू धरण्याची समस्या जाणवू लागली. त्या वेळी तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. नंतर काही काळाने योनीमार्गातून हलकासा रक्तस्राव सुरू झाला. त्यांनी डॉक्‍टरांकडे धाव घेतली. तेव्हा पॅपस्मिअर आणि सोनोग्राफी, सिटी स्कॅन आदी तपासणीअंती गर्भाशयात ट्युमर आढळून आला. 

याबाबत खारघरच्या मदरहुड रुग्णालयाचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुरभी सिद्धार्थ म्हणाले, रुग्णाला पोट फुगणे, पोटात वायू धरणे तसेच रजोनिवृत्तीनंतरही हलकासा रक्तस्राव होत असल्याची तक्रार होती. सोनोग्राफीमध्ये डाव्या अंडाशयातून जवळजवळ कलिंगडाच्या आकाराचा ट्युमर दिसून आला. ट्युमर रुग्णाच्या आतड्यावर दबाव आणत होता. सखोल तपासणीनंतर रुग्णाला लॅप्रोटॉमी घेण्याचा सल्ला देण्यात आला. 
ऑन्को सर्जन डॉ. शिशिर शेट्टी म्हणाले, रुग्णाला मदरहुडमध्ये दाखल केले होते. रुग्णावर लेप्रोटोमी आणि ओपन सर्जरी केली. तिची गर्भाशय, इतर अंडाशय आणि नलिका पुन्हा पुन्हा टाळण्यासाठी काढून टाकल्या. शस्त्रक्रियेनंतर तिसऱ्याच दिवशी रुग्णाला घरी पाठविले. आठवडाभरानंतर रुग्णाची तपासणी केली असता रुग्ण पूर्णतः बरे झाल्याचे दिसून आले. 

गर्भाशयातील ट्युमरमुळे मी निराश झाली. खारघर येथील मदरहुड रुग्णालयामधील डॉक्‍टरांनी मला प्रोत्साहन दिले. तसेच माझ्या शरीरातील इतर कोणत्याही अवयवांना इजा पोहोचणार नाही याची काळजी घेत यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पार पाडली, अशी प्रतिक्रिया या महिला रुग्णाने व्यक्त केली

-----------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

A big sized tumor in a womans uterus Successful surgery in Kharghar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com