घरावर कोसळले भलेमोठे झाड; विद्युत पुरवठा खंडित

दिनेश गोगी9
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

उल्हासनगर : भरत नगर रोडवरील निंबाचे भलेमोठे झाड विजेच्या वायरींवर कोसळल्याने दिवसभर विद्युत पुरवठा खंडित राहिला. या झाडाला कापण्यासाठी अग्निशमन दल तसेच झाड लवकर  कापल्यावर विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्याकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कॅम्प नंबर 4 मधील सुभाष टेकडीच्या पुढे भरतनगरच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी तोडलेल्या दोन्ही बाजूला मोठ्या नाल्यांसाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. याच खोदलेल्या खड्यांच्या बाजूला असलेले निंबाचे भलेमोठे झाड आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका घरावर व घरावरील विजेच्या तारांवर कोसळले. त्यामुळे विज पुरवठा खंडित झाला.त्याची झळ उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्वे सह अनेक परिसरांना बसली.

विद्युत मंडळाचे अधिकारी संजय देशपांडे यांनी त्यांच्या टीम सोबत झाड कोसळलेल्या ठिकाणी धाव घेतली. मात्र मोठे झाड तोडणे शक्य नसल्याने अग्निशमन दलाच्या बोलावण्यात आले. पण तेही एक तास उशिराने आल्यावर दलाने झाड कापण्यास सुरवात केली. संजय देशपांडे यांनी टीम सोबत तिथेच ठाण मांडले आणि झाड कापून झाल्यावर 5 वाजण्याच्या सुमारास विद्युत पुरवठा पूर्ववत केला.

Web Title: big trees fall at house; Break the power supply