तुला थोबडवणार...मराठीची चिड येते म्हणणाऱ्या कुमार सानूच्या मुलाला मनसेचा इशारा

पूजा विचारे
Wednesday, 28 October 2020

या वादा दरम्यान जान कुमार सानूनं मराठी गायक राहुल वैद्य याच्या शाब्दिक हल्लाबोल केला. मात्र यावेळी त्याने मराठी भाषेबद्दल अपमानकारक शब्दांचा वापर केला. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच भडकली आहे. 

मुंबईः  सध्या बिग बॉसचा १४ वा सिझन सुरु आहे. या शोमध्ये दररोज नवनवे वाद होत असतात. स्पर्धकांची एकमेकांसोबत रोजचं भांडणं सुरु असतात. आता शोमध्ये नवा वाद सुरु झाला आहे. गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोली यांच्यात जोरदार वाद सुरु झाला आहे. या वादा दरम्यान जान कुमार सानूनं मराठी गायक राहुल वैद्य याच्या शाब्दिक हल्लाबोल केला. मात्र यावेळी त्याने मराठी भाषेबद्दल अपमानकारक शब्दांचा वापर केला. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच भडकली आहे. 

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानूला धमकीवजा इशाराच दिला आहे. 

अमेय खोपकर यांनी ट्विट करुन इशारा दिला आहे. जान कुमार सानू... मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी... मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला.

आणखी एक ट्विट करत खोपकर यांनी लिहिलं की, मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी.लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं.

नेमकं प्रकरण काय 

खेळादरम्यान एक वाद झाला. या वादा दरम्यान जान कुमार सानूनं निक्की तांबोलीसोबत बोलताना मराठी भाषेची चीड येते असं म्हटलं. निक्कीनं जानसोबत मराठी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जान तिला म्हणाला की, माझ्याशी मराठीत बोलायचे प्रयत्न करु नकोस. माझ्यासोबत बोलायचे असेल तर हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असं तो म्हणाला.

अधिक वाचा-  सामान्यांसाठी लवकरच लोकल सुरु होणार, ठाकरे सरकार देणार दिवाळी गिफ्ट?

बिग बॉसच्या १४ व्या सिझनमध्ये मराठी गायक राहुल वैद्यही सहभागी झाला आहे. जान कुमार सानू आणि निक्की तांबोली यांच्यात सुरुवातील घट्ट मैत्री होती. काही कारणानं त्यांच्या मैत्रीत फूट पडली. त्यानंतर निक्कीनं जानची मैत्री सोडून राहुलसोबत मैत्री केली.

Bigg Boss contestant Jaan kumar sanu statement Marathi language MNS Ameya Khopkar Warns


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bigg Boss contestant Jaan kumar sanu statement Marathi language MNS Ameya Khopkar Warns