सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण दिसणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

मुंबई - या शतकातील सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण शुक्रवारी (ता. 27) आषाढ पौर्णिमेच्या रात्री आहे. ते संपूर्ण भारतातून दिसणार आहे. हे चंद्रग्रहण तीन तास 55 मिनिटांचे असून त्यातील खग्रास स्थिती एक तास 43 मिनिटे दिसेल, अशी माहिती पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. 

सोमण म्हणाले, की खग्रास चंद्रग्रहणाच्यावेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असेल आणि चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेच्या मध्यातून जाणार असेल तर एकूण ग्रहण कालावधी व खग्रास स्थितीही जास्त वेळ असू शकते. शुक्रवारी चंद्र पृथ्वीपासून जास्त दूर म्हणजे चार लक्ष सहा हजार किलोमीटरवर असेल. त्यामुळे चंद्राला पृथ्वीच्या छायेतून भ्रमण करण्यास जास्त वेळ म्हणजे तीन तास 55 मिनिटे लागतील. त्याचमुळे हे खग्रास ग्रहण सर्वांत मोठे आहे. हे ग्रहण अंटार्क्‍टिका, ऑस्ट्रेलिया, रशियाचा काही भाग, संपूर्ण आशिया, आफ्रिका, युरोप, मध्य आणि दक्षिण अमेरिका येथून दिसेल. 

शुक्रवारी रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी ग्रहणास प्रारंभ होईल. पहाटे एक वाजता खग्रास स्थितीला प्रारंभ होईल. पहाटे 2 वाजून 43 मिनिटांनी खग्रास स्थिती संपेल तर 3 वाजून 49 मिनिटांनी ग्रहण सुटेल. यापुढील अशी मोठी चंद्रग्रहणे 9 जून 2123 व 19 जून 2141 रोजी होणार आहेत. त्या वेळी खग्रास स्थिती 1 तास 46 मिनिटे दिसेल. 

चंद्राजवळ मंगळ 
या वेळी चंद्रबिंबाच्या दक्षिणेस सात अंशावर मंगळ ग्रह दिसणार आहे. पावसाळा आकाश निरभ्र असेल तेथून खग्रास चंद्रग्रहण व मंगळ दर्शनाचा लाभ घेता येईल. यानंतर पुढच्या वर्षी 16 जुलैचे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसेल.

Web Title: The biggest lunar eclipse of the century is the lunar eclipse on Friday