हे आहे राज्यातील सर्वात मोठं क्वारंटाईन सेंटर; इथे एकूण बेड्स आहेत तब्बल.....

हे आहे राज्यातील सर्वात मोठं क्वारंटाईन सेंटर; इथे एकूण बेड्स आहेत तब्बल.....

मुंबई - महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना पाहायला मिळतेय. मुंबईत देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्याने मुंबईत सर्वाधिक चिंता आहे. येत्या काळात मुंबईत कोरोना रुग्णांची आकडेवारीमध्ये मोठी वाढ होणार असल्याचं देखील बोललं जातंय. अशात आता महानगरपालिकेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील सर्वात मोठ्या एक्झिबिशन सेंटर्स पैकी एक असणाऱ्या गोरेगाव नेस्को मैदानात ५ मोठे एक्झिबिशन हॉल आहेत. या सर्व हॉलचं रूपांतर आता क्वारंटाईन कक्षात करण्यात येतंय. 

नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये ५ मोठे हॉल आहेत, हे हॉल आता अलगीकरण कक्ष म्हणजे 'क्वारंटाईन वॉर्ड' म्हणून रूपांतरित करण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब या अलगीकरण कक्षामुळे आता १२४० बेड्सचं मोठं क्वारंटाईन सेंटर तयार होतंय. में महिन्याच्या पहिल्या आठवडयात हे काम  पूर्ण होणार आहे. या सेंटरमध्ये तब्बल २०० टॉयलेट्सची देखील सोय केली गेलीये, यामध्ये आणखीन वाढ करण्यात येणार आहे. हे तेच मैदान आहे जिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या नव्या झेंड्याचं अनावरण केलेलं आणि इथे अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम तसंच एक्झिबिशन पार पडतात.

सध्या इथे ३०० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. बाकीच्या बेड्सची व्यवस्था मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करण्यात येणार आहे. १२४० बेड्स चं हे मुंबईमधील सर्वात मोठं क्वारंटाईन सेंटर असणार आहे. दरम्यान इथे ठेवण्यात येणार्यांना आणि त्यांच्या नातलगांना त्रास होऊ नये म्हणून इथे विविध हेल्पडेस्क देखील बनवण्यात आलेत. ज्यामध्ये चौकशी कक्ष,  सॅनिटायझेशन कक्ष, मेडिकल चेकअप असे विविध कक्ष आहेत.   

biggest quarantine center is under construction in goregaon

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com