बिहार निवडणूक निकालः शिवसेनेने आपलं तोंड बंद ठेवावं, निरुपमांचा राऊतांना सल्ला

पूजा विचारे
Wednesday, 11 November 2020

काँग्रेसने चांगली कामगिरी केली असती तर तेजस्वी आत्तापर्यंत मुख्यमंत्री झाला असता असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला टोला लगावला होता.  यावर आता  काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

मुंबईः बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने स्पष्ट 125 जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे एनडीएनं आपली सत्ता कायम राखली आहे.  सर्व 243 जागांचे निकाल हाती आलेत.  NDA ने 125 जागा जिंकल्या आहेत तर महागठबंधननं 110 जागांवर यश मिळवलं आहे. या निवडणुकीत शिवसेनेनं 22 जागा लढवल्या होत्या. शिवसेनेचा एकही उमेदवार विजयी झाला नाही आहे. तसंच काँग्रेसने चांगली कामगिरी केली असती तर तेजस्वी आत्तापर्यंत मुख्यमंत्री झाला असता असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला टोला लगावला होता.  यावर आता  काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

संजय निरुपम यांनी ट्विटवरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, शिवसेनेने बिहारमध्ये 22 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यातल्या 21 जागांवर त्यांना नोटापेक्षाही कमी मतं मिळाल्याचं ऐकलं आहे. त्यामुळे काँग्रेसला सल्ला देत बसण्यापेक्षा शिवसेनेने आपलं तोंड बंद ठेवावं.

बिहारमध्ये जे निकाल हाती येत आहेत त्यात काँग्रेसची कामगिरी ही फारशी चांगली राहिली नाही असं स्पष्ट होत आहे. त्यावरून राऊतांनी काँग्रेसला टोला लगावला होता.

अधिक वाचा-  कोरोनामुक्तीनंतर अन्य आजारांचा धोका! रक्त, ऑक्‍सिजन तपासण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला
 

संजय राऊत काय म्हणाले होते

भाजप आता मित्रांना व्यवस्थित वागवते आहे.  त्यामुळे नितीश कुमार यांनी सेनेला धन्यवाद दिले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे, देवेंद्र फडणवीस हे बिहारच्या निवडणुकीत प्रमुख होते. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर केंद्रातही त्यांचे वजन आहे. त्यामुळे त्यांनी नक्कीच बिहारमध्ये सूत्र फिरवली असतील, त्यामुळे महाराष्ट्राच्या परंपरेनुसार त्यांचे अभिनंदन नक्कीच केले पाहिजे, अस राऊत म्हणाले होते.

Bihar election result Shiv Sena should keep its mouth shut Sanjay Nirupam advises Sanjay Raut


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar election result Shiv Sena should keep its mouth shut Sanjay Nirupam advises Sanjay Raut